Zenito Cardozo: हिस्ट्री शिटर जेनिटो कार्दोजला क्लीन चीट

Zenito Cardozo: तडीपार प्रकरण : पोलिसांचा अर्ज फेटाळला
Zenito Cardozo | Goa News
Zenito Cardozo | Goa News Dainik Gomantak

Zenito Cardozo: सांताक्रुझमधील 2020 मध्ये दोन गटांत झालेल्या गोळीबार प्रकरणासह गोव्यात आणि गोव्याबाहेर अनेक गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या हिस्ट्री शिटर ​​झेनिटो कार्दोज याला तडीपार प्रकरणातून क्लीन चीट मिळाली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी झेनिटो याला तडीपार करण्याचा दाखल केलेला अर्ज फेटाळला.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मामू हागे यांनी गोवा पोलिसांनी दाखल केलेला खटला फेटाळताना ​​झेनिटो कार्दोज याला किमान सहा महिन्यांसाठी चांगल्या वागणुकीसाठी 2 लाख रुपयांची हमी देण्याचाआदेश दिला आहे. त्याने अटींचे उल्लंघन केल्यास पोलिसांना त्याच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्याचे व हमीची रक्कम जप्त करण्याचे निर्देश हागे यांनी दिले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांपूर्वी, उत्तर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी झेनिटो कार्दोज व इतर गुन्हेगारांविरुद्ध दाखल केलेल्या अर्जात तडीपारीची शिफारस केली होती.

Zenito Cardozo | Goa News
Goa Crime Case: ओळखीच्या व्यक्तींकडूनच घात? गोव्यातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं 'हे' उत्तर

कायद्याची साथ

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या झेनिटोला 2013 मध्ये अटक केली होती, ज्याला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्याच्या विरुद्धचा हा आदेश रद्दबातल ठरविला होता. तडीपार करून त्याच्यावर रासुका गुन्हा दाखल करण्याचा गोवा पोलिसांनी केलेला प्रयत्नही 2017 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com