Goa Panchayat Election 2022: कारापूर-सर्वण प्रचार अंतिम टप्प्यात

सरपंच, उपसरपंचांसह सात मावळते पंच रिंगणात
Karapur Panchayat Election
Karapur Panchayat ElectionDainik Gomantak

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायतीत प्रचाराची रणधुमाळी सुरु असून, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच प्रभागांत चुरस निर्माण झाली आहे. बहुतेक प्रभागांत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा आपले भवितव्य अजमावत असलेल्या काही मावळत्या पंचसदस्यांसमोर नवोदितांनी आव्हान उभे केले आहे.

(Goa Panchayat Election 2022: Karapur campaign in final phase)

Karapur Panchayat Election
Govind Gawde: सडलेल्या डाळ प्रकरणात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

सरपंच, उपसरपंचांसह सात मावळते पंच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूने ओबीसी’साठी राखीव असलेल्या या पंचायतीच्या प्रभाग-८ मधून दिव्या दिनेश नाईक या बिनविरोध निवडून आल्याने फक्त दहा प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. दहा प्रभागांतून मिळून एकूण 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग-9 आणि-10 मधून प्रत्येकी दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग 10 मधून मावळते उपसरपंच योगेश पेडणेकर पुन्हा एकदा भवितव्य आजमावत आहेत.

Karapur Panchayat Election
गोव्यातील तरुणाचा पुण्यात गूढ मृत्यू

प्रभाग-११ प्रचारात आघाडीवर

महिलांसाठी राखीव आणि परप्रांतीयांचा भरणा असलेल्या प्रभाग-11 मध्ये चुरस वाढली असून, या प्रभागातून माजी पंच मदार यांच्यासमोर रुक्सना मेहबूब सय्यद हिने मोठे आव्हान उभे केले आहे. रुक्सना यांनी प्रभागात जोरदार प्रचार सुरु केला असून, विकासाचे मुद्दे घेऊन त्या घरोघरी संपर्क साधत आहेत. त्यांना कन्नड महासंघाचाही वाढता पाठींबा आहे.

माजी सरपंचांची प्रतिष्ठा पणाला

प्रभाग-6 मधून 5 उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. या प्रभागातून मावळते सरपंच दामोदर गुरव यांच्यासह माजी सरपंच संतोष तळकर आणि आर्यन गावकर हे तीन माजी सरपंच आमनेसामने उभे ठाकले आहे. त्यामुळे या प्रभागात माजी सरपंचांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतदारांचे त्‍याकडे लक्ष लागून राहिले आहे. माजी सरपंच लक्ष्मण गुरव हे प्रभाग-5 मधून तर माजी सरपंच उज्‍ज्वला कवळेकर या प्रभाग-7 मधून पुन्हा आपले भवितव्य अजमावित आहेत. कवळेकर यांना तर पुतण्यानेच आव्हान दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com