Goa Panchayat Election: राजकारणाचा नादच खुळा ! 82 व्या वर्षी आजोबा उतरले निवडणूक रिंगणात

मये मतदार संघातील भागो वरक यांनी भरला उमेदवारी अर्ज
Goa panchayat Election 2022
Goa panchayat Election 2022Dainik Gomantak

गेले काही दिवस गोव्यात ग्राम पंचायत निवडणूकीच्यानिमित्ताने सर्व राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. सर्व संभाव्य उमेदवारांच्या खलबतांना ही वेग आला आहे. मात्र या निवडणूकीचं लक्ष एका उमेदवाराने वेधले आहे. ते म्हणजे मये मतदार संघ ग्रामपंचायतीत 82 वर्षीय एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 82 व्या वर्षी आपला अर्ज भरला असल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

Goa panchayat Election 2022
नव्या संसद भवनसाठी गोव्यातील माती नवी दिल्लीत पोहोचली

कुडचडे पंचायत क्षेत्रातील मये मतदार संघात असणाऱ्या वार्ड नंबर 6 मधील भागो वरक नामक व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरक यांनी 1998 मध्ये आपली पहिली पहीली विजश्री खेचून आणली होती. यानंतर आता ते पुन्हा निवडणूक लढणार आहेत. आपण हा लढा केवळ लोकांच्या आग्रहाखातर लढणार आहोत. तसेच आपण याचसाठी निवडूक रिंगणात उतरलो आहे. असे ते म्हणाले.

Goa panchayat Election 2022
Dabolim: चिमुरडीचा जन्मदात्रीनेच घोटला गळा कारण...

वरक यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जेंव्हा मी पहिल्यांदा निवडूक लढलो होतो तेंव्हा या वाड्यात रस्ते न्हवते, घरात पाणी न्हवते तसेच लाईट ही पोहोचली न्हवती अशा वेळी मी येथे पाच वर्ष काम केले आहे. आज ही काही प्रश्न वाड्यावर आहेत. ते मला सोडवायचे आहेत. तसेच वाड्यावरील लोकांची ही तशी इच्छा असल्याने मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

म्हणून वरक उतरले निवडणूक रिंगणात

गेले काही दिवस ग्रामपंचायत कारभार समाधानकारक सुरु नाही. त्यामूळे नागरिकांच्या समस्या जैसे थे आहेत. त्यामूळेच वाड्यावरील अनेक नागरिकांनी मला यावेळी रिंगणात उतरण्यास तयार झालो असे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com