काणकोण तालुक्यात 76 महिला उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात

लोलये, पैंगीण, श्रीस्थळमध्‍ये ‘महिलाराज’ येण्‍याची शक्‍यता
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

काणकोण : काणकोण तालुक्यातील सात पंचायतींच्‍या 56 प्रभागांतून एकूण 76 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांपैकी 63 महिला महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून निवडणूक लढवित आहेत, तर 13 महिला उमेदवार अन्‍य प्रभागांतून रिंगणात आहेत.

काणकोणात बिनविरोध निवडून आलेले तीन प्रभाग वगळता 56 वॉर्डांतून 169 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. खोला पंचायत क्षेत्रातील 30 उमेदवारांपैकी 11 उमेदवार महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून तर तीन महिला उमेदवार राखीव नसलेल्या वॉर्डातून निवडणूक लढवित आहेत.

आगोंद पंचायतीच्या 20 उमेदवारांपैकी 9 उमेदवार महिलांसाठी राखीव असलेल्या तर दोन उमेदवार महिलांसाठी राखीव नसलेल्या वॉर्डातून लढत आहेत. श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील 27 उमेदवारांपैकी 10 महिला उमेदवार राखीव प्रभागांतून, पैंगीण पंचायतीच्या 25 उमेदवारांपैकी 10 महिला उमेदवार राखीव वॉर्डांतून, लोलये पंचायतीच्‍या 9 महिला उमेदवार राखीव वॉर्डांतून, गावडोंगरी पंचायतीच्‍या क्षेत्रात 21 उमेदवारांपैकी 6 महिला उमेदवार राखीव तर एक महिला उमेदवार राखीव नसलेल्या वॉर्डांतून तर खोतीगाव पंचायतीच्‍या 20 उमेदवारांपैकी आठ महिला उमेदवार राखीव असलेल्या व एक उमेदवार राखीव नसलेल्या वार्डांतून निवडणूक लढवित आहे.

Goa Panchayat Election
गोव्यात रस्ता सुरक्षा निधीचा 24 टक्केच वापर

महिला उमेदवारांची ही संख्या लक्षणीय असून आजपर्यंतच्या पंचायत निवडणुकीत एवढ्या मोठ्या संख्येने महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या नव्हत्या. काणकोण तालुक्यात तीन पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असणार आहे. त्याचा प्रभाव म्हणून लोलये, पैंगीण व श्रीस्थळ पंचायतीत ‘महिलाराज’ येण्याची शक्यता आहे. पैंगीण पंचायतीच्या आमोणे वॉर्डातून सभापती रमेश तवडकर यांच्‍या पत्नी सविता तवडकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या पंचायतींचे सरपंचपदही महिलांसाठी राखीव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com