बिनविरोध निवडणुकीत बार्देशची सरशी

बार्देशमध्ये आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक 13 उमेदवारांना लागली पंचपदाची लॉटरी
Panchayat Election
Panchayat ElectionDainik Gomantak

म्हापसा : पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्देश तालुक्यातून राज्यात सर्वाधिक 13 उमेदवारांना बिनविरोध पंचसदस्यत्वाची लॉटरी लागली आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 134 जणांनी आपले नामांकन मागे घेतले. या तालुक्यातून आता 995 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये पेन्ह-दी-फ्रान्स पंचायतच्या प्रभाग 8 मधून सिद्धेश नाईक. तसेच साल्वादोर-दु-मुंद पंचायतच्या प्रभाग 2 मधून संदीप साळगावकर तर प्रभाग 3 मधून रिना फर्नांडिस यांचा समावेश आहे. नादोडा पंचायतीच्या प्रभाग 3 मधून परेश गावस, 4 (ओबीसी महिला) मधून मधुरा मांद्रेकर, 5 (ओबीसी) मधून रामा नादोडकर यांची बिनविरोध निवड झाली.

Panchayat Election
ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं; भरधाव कार झुआरी पुलावरुन खाली कोसळली

कुठून व किती जणांची माघार... : शिवोली-सडये 3, शिवोली-मार्ना 4, कामुर्ली 5, ओशेल 4, कोलवाळ 4, अस्नोडा 3, रेवोडा 3, पिर्णा 3, पोंबुर्फा-ओलावळी 2, बस्तोडा 1, उसकई-पालये-पुनोळा 1, शिरसई 1, थिवी 5, मयडे 2, नास्नोळा 2, हणजूण-कायसूव 6, वेर्ला-काणका 9, आसगाव 5, कळंगुट 5, कांदोळी 7, हडफडे-नागवा 6, सुकूर 6, साळगाव 3, पर्रा 7, गिरी 5, रेईश-मागूस 10, पिळर्ण-मार्रा 1, नेरुल 4, सांगोल्डा 3, पेन्ह-दी-फ्रान्स 8, साल्वादोर-दु-मुंद 6.

रेईश मागूस पंचायतमधून सहा उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. यामध्ये साळगावचे आमदार केदार नाईक यांच्या पाच समर्थकांचा समावेश आहे. झेवियर रिबेरो (प्रभाग 1), उमेश मयेकर (ओबीसी प्रभाग 3), सुभाष पेडणेकर (प्रभाग 4), संगीता भोसले (महिला प्रभाग 9) व नैना नाईक (महिला प्रभाग 10). विशेष म्हणजे, नैना नाईक या आमदार केदार नाईक यांच्या मातोश्री आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com