Panchayat Election : मडगाव पोलिसांची मद्यालयांवर नजर

पंचायत निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने मडगावांतील मद्यालयांचा या निवडणुकीसाठी कोणी वापर करु नये म्हणून पोलिस उप अधिक्षक शिवेंदू भूषण यांनी पावले उचलली आहेत.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

मडगाव : पंचायत निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने मडगावांतील मद्यालयांचा या निवडणुकीसाठी कोणी वापर करु नये म्हणून पोलिस उप अधिक्षक शिवेंदू भूषण यांनी पावले उचलली आहेत.

Goa Panchayat Election
Goa Rain Updates : 4 ऑगस्टपासून गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

नुकतीच त्यांनी पोलिस निरिक्षक तुळशिदास नाईक यांच्या सोबत पंचायत क्षेत्राला भिडून असलेल्या मडगावातील भागाचा फेरफटका मारला तसेच तेथील मद्यालयांना त्यांच्या वेळा पाळण्यास सांगितले वेळेबाहेर खुले असल्याचे आढळल्यास कारवाईचा इशारा दिला. हे भाग पंचायत क्षेत्राला भिडून असल्याने तेथील लोक येऊन मद्यालयांचा वापर निवडणुकी साठी करतील असा कयास करुन ही खबरदारी घेतली आहे.

राजेंद्र प्रसाद स्टेडियम रस्ता, जुना स्टेशन रोड, रावणफोंड या भागांतील मद्यालय चालकांना त्यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास होणा-या परिणामांची कल्पना दिली.

एवढेच नव्हे तर आता त्यांनी रोज जुना व नवा स्टेशनरोड भागात दोन पोलिस जिपी तैनात केल्या त्यामुळे तेथील कारवायांना आळा बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com