राज्यातील पंचायतींमध्येही पक्षीय राजकारणाचा संसर्ग

64 बिनविरोध : 1464 प्रभागांकरिता 5038 उमेदवार रिंगणात
Panchayat Election
Panchayat ElectionDainik Gomantak

पणजी : राज्यातील 186 ग्रामपंचायतींच्या 1464 प्रभागांकरिता 5038 उमेदवारांत झुंज रंगणार आहे. आज बुधवारी 621 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जाणार नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वारस्य असलेल्या राजकीय पक्षांनी व आमदार-पक्ष‌ पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला अनुकूल असलेल्या उमेदवारांना उघड व छुपा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणूक एका परीने आमदार तसेच अन्य राजकीय नेत्यांच्या लोकप्रियतेची कसोटीच ठरणार आहे. काही आमदारांनी तर आपले समर्थक आणि नातलगांना रिंगणात उतरवले आहे.

27 जुलै ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अर्ज माघार घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचे सहाय्यक संचालक सागर गुरव यांनी राज्यातील उमेदवारांची आकडेवारी स्पष्ट केली. 621 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने 12 तालुक्यातील 64 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीशिवाय पंच बनले आहेत. 1464 प्रभागांकरिता 5 हजार 38 उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपने बहुतांश पंचायतींमध्ये स्थानिक आघाड्या उभा केल्या आहेत व त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार, स्थानिक नेते, मंडल अध्यक्ष यांना सक्त सूचना देण्यात आल्यात. काँग्रेसमध्ये या निवडणुकांच्या बाबत अनास्था दिसत आहे. तर आम आदमी पक्ष, मगोप, गोवा फॉरवर्ड यांनी आपले स्थानिक मतदारसंघ, गडामध्ये मोर्चे बांधणी केली आहे.

Panchayat Election
मध्यरात्री पुलाचे रेलिंग तोडून कार झुआरी नदीत कोसळली!

बार्देश तालुक्यातून एकूण 13 उमेदवार बिनविरोध पंचसदस्य म्हणून निवडून आले. 134 जणांनी आपले नामांकन मागे घेतले. या तालुक्यातून आता 995 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. सासष्टीतील 33 पंचायतीतून आज 64 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 863 उमेदवार रिंगणात राहिले

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट झाल्याने नेते आणि त्यांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश राजकीय पक्ष व नेत्यांनी आपल्या समर्थकांसह नातलगांनाही मैदानात उतरविले आहे.त्यामुळे ही निवडणूक पक्षाच्या पश्‍चात प्रतिष्ठेचा कस पाहणारी ठरेल. सभापती रमेश तवडकर, काँग्रेसचे नेते मायकल लोबो, माजी मंत्री दीपक पाऊस्कर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com