Goa Panchayat Election : दिग्गजांची ताकद, प्रतिष्ठा पणाला; आज प्रत्यक्ष मैदान

पंचायत निवडणुकीत 5 हजार 38 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
Goa panchayat election
Goa panchayat electionDainik Gomantak

Goa Panchayat Election : राज्यातील 186 पंचायतींच्या 1464 प्रभागांसाठी उद्या बुधवारी सकाळी 8 ते सायंकाळ 5 पर्यंत मतदान होत आहे. यासाठी तब्बल 5 हजार 38 उमेदवार रिंगणात आहे. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहोचले आहे.

निवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी), आप पुन्हा सक्रिय झाले असले भाजपने आपले मंत्री, आमदार आणि समर्थकांना सर्व प्रकारची रसद पुरवल्याची माहिती आहे. राजकीय पक्षांना स्थानिक नेटवर्क घट्ट करण्याचे ही आयती संधी आल्याने ते पुढे सरसावले आहेत.

पंचायतींच्‍या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील 1 हजार 49 ठिकाणी 1566 मतदान केंद्रे उभा केली आहेत. यापैकी 45 मतदान केंद्र ही संवेदनशील मतदान केंद्र म्हणून जाहीर केलीत. मंगळवारी दुपारी राज्यातील बाराही तालुक्याच्या नियोजित मतमोजणी केंद्रावरून मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन हे कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. मतदारांनी कोरोना नियमांचे पालन करून मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

Goa panchayat election
Smriti Irani : 'सिली सोल्स' प्रकरणात सरकारकडून स्मृती इराणींची पाठराखण

या निवडणुकीत कोरोनाबाधित मतदारांना शेवटच्‍या तासात (4 ते 5 या वेळेत) मतदानाचा अधिकार मिळणार आहे. पंचायत राज कायद्यात तरतुदीअभावी 80 वर्षांवरील ज्‍येष्‍ठ नागरिक, दिव्‍यांगांना मतपत्रिकेची सुविधा नाही. त्‍यांना मतदान केंद्रावरच मतदान करावे लागणार आहे. मात्र त्‍यांना मतदान करताना प्राधान्‍य मिळेल.

10 आणि 12 ऑगस्ट ड्राय डे

राज्यातील पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर 10 ऑगस्ट रोजी आणि मतमोजणीच्या दिवशी 12 ऑगस्टला पूर्णतः दारूबंदी (ड्राय डे) असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com