Goa Panchayat Election : मुळगावात माजी सरपंचांची कसोटी

चार प्रभागातून मिळणार नवीन चेहरे
Mulgao Panchayat
Mulgao PanchayatDainik Gomantak

डिचोली : पंचायत निवडणुका जवळ आल्याने डिचोली मतदारसंघातील मुळगाव पंचायतीत सध्या प्रचाराला जोर आला आहे. सात प्रभाग असलेल्या मुळगाव पंचायतीतून नऊ महिलांसह 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

(Goa Panchayat Election)

Mulgao Panchayat
Goa Swimming Association : जलतरणपटूंसाठी निवड चाचणी 5 ऑगस्टला

मावळत्या पंचायत मंडळातील तीन मिळून पाच माजी पंच यावेळी पुन्हा एकदा आपले भवितव्य आजमावणार आहेत. तर चार मावळते पंच यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. मुळगावातील प्रचाराची रणधुमाळी माजी पंचसदस्यांसमोर आव्हान उभे ठाकले असून,चार प्रभागातून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

प्रभाग-1 मधून सर्वात अधिक पाच उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

माजी सरपंच रिंगणात

मावळते सरपंच गजानन मांद्रेकर यांच्यासह संतोष सराफ आणि उमेश मयेकर हे माजी सरपंच तसेच मावळत्या पंचायत मंडळातील पंच विशालसेन गाड आणि तृप्ती गाड हे या निवडणुकीत आपले भवितव्य अजमावीत आहेत.

तर माजी उपसरपंच आनंदी परब यांच्यासह माजी सरपंच प्रकाश आरोंदेकर, महेश्वर परब आणि संजय वायंगणकर हे मावळत्या पंचायत मंडळातील चार पंचसदस्य यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com