Smart City Project: पणजीत स्मार्ट सिटी योजेनची कामे 2023 अखेर पूर्ण करणार...

River: उपमहापौर संजीव नाईक म्हणाले शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत पाच प्रकल्पांची कामे पूर्ण करु.
Mandvi River
Mandvi RiverDainik Gomantak

Goa River: पणजी शहरात सुरु असणारे प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत होत आहेत. अशा प्रकारचे पाच प्रकल्प आम्हाला 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहेत. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या साहाय्याने ते पूर्ण होत आहे. प्रकल्पासंबंधी ज्या परवानग्या लागतात त्या आम्ही निश्चितपणे घेतल्या आहेत,असे पणजी महानगरपालिकेचे उपमहापौर संजीव नाईक सांगितले.

पुढे ते म्हणाले, 'ज्यांना कुणाला या प्रकल्पांबद्दल माहिती हवी असेल त्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट द्यावी व आपल्याला हवी ती माहिती घ्यावी, असे प्रतिपादन पणजी महानगरपालिकेचे उपमहापौर संजीव नाईक यांनी केले. त्यांना कांपाल येथे सुरू असलेल्या प्रकल्पाबद्दल विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.

कांपाल येथील मांडवी नदीत सुरू असलेल्या प्रकल्पाला काल पणजीतील काही नागरिकांनी आक्षेप घेत कामाबद्दल संशय व्यक्त केला होता. हा प्रकल्प काही विशिष्ट हेतूंनी होत नाही ना? अशा प्रकारचा प्रश्‍नदेखील उपस्थित करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे मांडवी नदीचे पाणी तुंबेल, पर्यावरणाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचा जर धक्का बांधला तर नदीला नाल्याचे स्वरूप येईल, हा वॉक वे असेल तर त्याबद्दल माहिती नागरिकांना पुरविणे गरजेचे असल्याचे उपस्थित नागरिकांचे म्हणणे होते.

कामात पारदर्शकता हवी

  • पूर्वी या नदीचे पाणी अशा प्रकारे तुंबत नव्हते, त्याला दुर्गंधी येत नव्हती. त्यामुळे येथील कामाचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

  • भविष्यात या प्रकल्पांमुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते.

  • या प्रकल्पाला काहींनी विरोध दर्शविला नव्हता. मात्र, सर्व काम पारदर्शकपणे होणे गरजेचे असल्याचे मत काही उपस्थित नागरिकांद्वारे व्यक्त करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com