Panjim Market: पणजीत अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..

वाहतूक कोंडीत वाढ: बांदोडकर मार्गावर वाहतूक पोलिसाची गरज
Panjim Market
Panjim MarketDainik Gomantak

Panjim Market गणेशोत्सव नऊ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच सरकारी व खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या वेतनधारकांचे वेतनही हाती पडले असल्याने अनेकांनी रविवारच्या सुटीत अष्टमीच्या फेरीत खरेदीसाठी गर्दी केली होती.

सायंकाळी बांदोडकर मार्गावर वाहनांची गर्दी दिसून येत आली. फेरीच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसल्यामुळे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. संबंधितांनी त्वरित वाहतूक पोलिसाची व्यवस्था करावी, अशी पणजीकरांची मागणी आहे.

Panjim Market
Ganesh Chaturthi 2023: काणकोणात पाच हजार मूर्ती तयार, रंगरंगोटी अंतिम टप्पात

मांडवी किनारी महापालिकेतर्फे अष्टमीच्या फेरी भरविण्यात आली आहे. स्थानिक व्यावसायिकांपेक्षा परराज्यातील व्यावसायिकांची अधिक दुकाने या ठिकाणी पहायला मिळत आहेत.

रविवार असल्याने खरेदीसाठी आणि लाकडी वस्तू आगाऊ रक्कम देऊन आरक्षित करण्यात अनेकांचा रस दिसून आला.

विशेष बाब म्हणजे ‘गोमन्तक’ने येथील व्यावसायिकांसाठी शौचालयाची सुविधा नसल्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतर महानगरपालिकेने या ठिकाणी प्लास्टिकच्या शौचालयांच्या युनिटची सोय केली आहे.

विशेष बाब म्हणजे स्थानिकांकडून खास करून काही लाकडी वस्तू खरेदीवर भर दिसत होता. तर भाडेकरू व इतर भागातून आलेल्या लोकांकडून विविध कपडे व वस्तू खरेदीवर भर असल्याचे दिसून येत होते.

Panjim Market
Mopa Airport: ‘मोपा’मुळे विकासाचा मार्ग ‘सोपा’!

महापालिकेला 80 लाखांचा महसूल

महापालिकेला यावर्षी फेरीतून किमान 80 लाखांचा महसूल अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महानगरपालिकेने फेरीच्या एकूण दिवसांचे भाडे आणि अर्जाचे वेगळे 500 रुपये अशी एकूण रक्कम आकारणी सुरू केली. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी महानगरपालिका व्यवस्थापन आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com