पराग गजानन रायकर यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

माजी आमदार गजानन रायकर यांचे पुत्र पराग गजानन रायकर यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

पणजी: माजी आमदार गजानन रायकर यांचे पुत्र पराग गजानन रायकर यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी तसेच प्रत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पाठवले आहे.

गोव्याच्या सार्वमत दिनाचा म्हणजेच गोव्याच्या अस्मिता दिनाचा मुहूर्त साधत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस सेवादल यामध्ये दक्षिण गोव्यात ते सक्रिय होते दक्षिण गोवा समितीतही कार्यरत होते. दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे एक प्रमुख नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

ते पुढे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मडगाव पालिका निवडणुकीत काँग्रेस विरोधात लढण्यासाठी भाजपने सर्व तयारी चालवली आहे त्या तयारीचा एक भाग म्हणून पराग गजानन रायकर यांच्या राजीनाम्याकडे पाहिले जात आहे.

आणखी वाचा:

 गोवा राज्यातही कोरोना लसीकरणास सुरवात -

संबंधित बातम्या