पॉप्युलर फ्रंटने लावलेले पोस्टर ‘परशुराम गोमंतक सेने’ने हटवले

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेने मडगावात ठिकठिकाणी लावलेले ‘बाबरी विल राईज’ असा संदेश लिहिलेले पोस्टर गोवा परशुराम गोमंतक सेनेने काढून टाकले.

मडगाव  :  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेने मडगावात ठिकठिकाणी लावलेले ‘बाबरी विल राईज’ असा संदेश लिहिलेले पोस्टर गोवा परशुराम गोमंतक सेनेने काढून टाकले. पॉप्युलर फ्रंट संघटना दहशतवादी प्रृत्तीची असल्याचा आरोप करून या संघटनेचा तसेच गोवा सरकारचा परशुराम सेनेने यावेळी निषेध केला.  अयोध्येत राममंदिर बांधण्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, पण हे पोस्टर लावून समाजात धार्मिक भावना भडकावण्याचे काम पॉप्युलर फ्रंट करत आहे. धार्मिक सलोख्यासाठी गोव्याचा लौकीक आहे, पण गोव्यात दहशतवादी प्रवृत्तीच्या संघटना शिरकाव करू लागल्या आहेत. याचे हे पोस्टर द्योतक असल्याचे परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले. यावेळी सेनेचे सचिव आदिल उसगावकर उपस्थित होते.

पॉप्युलर फ्रंटवर काही राज्यात बंदी घालण्यात आली आहे. गोव्याचे सरकार या संघटनेवर बंदी घालण्यास कचरत असून गोव्याचा धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणारी पॉप्युलर फ्रंट संघटना व सरकारच्या नाकर्तेपणाचा परशुराम गोमंतक सेना तीव्र निषेध करत असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.

 

अधिक वाचा :

गोव्यातला कोरोना बळींचा आकडा ७०१ वर

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपची लबाडी 

राजधानी पणजीत आंदोलनांचे पेव ; जीवरक्षक संघटनेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू 

संबंधित बातम्या