Goa: नुकसान भरपाई त्वरित द्या, मयेतील शेतकऱ्यांची मागणी

खाणग्रस्त शेतकरी एकवटले, 25 रोजी डिचोलीत मोर्चा?
Goa: नुकसान भरपाई त्वरित द्या, मयेतील शेतकऱ्यांची मागणी
खाणग्रस्त शेतकरीDainik Gomantak

Bicholim: खाण कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या (Akhil Bharatiy Kisan Sabha) बॅनरखाली लढा देणारे खाणग्रस्त (Mine suffers) मये गावातील शेतकरी पुन्हा एकवटले आहेत. संबंधित खाण कंपन्यांनी गेल्या सहा वर्षांपासूनची थकीत नुकसान भरपाई (Indemnity) त्वरित द्यावी. अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 25 ऑक्टोबर रोजी डिचोलीत मोर्चा (March at Bicholim) काढण्याची तयारीही या शेतकऱ्यांनी ठेवली आहे.

खाण व्यवसायामुळे शेती धोक्यात आल्याने खाणग्रस्त मयेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे मये भागात कार्यरत असलेल्या सध्याच्या सेझा आणि चौगुले कंपनीशी लढा चालू आहे. 2013 नंतर आतापर्यंतची नुकसान भरपाई देण्यास कंपनीकडून टाळाटाळ झाली आहे. थकीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेमार्फत शेतकऱ्यांनी डिचोलीच्या मामलेदारांकडे अर्ज केला आहे. अशी माहिती अखिल भारतीय किसान सभा मयेचे अध्यक्ष कृष्णा गडेकर यांनी दिली.

खाणग्रस्त शेतकरी
ड्रोनद्वारे खत, किटकनाशक फवारणी; कृषी क्षेत्रात गोव्याची उत्क्रांती

डिचोली शहरात मोर्चा काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

नुकसान भरपाईसाठी किसान सभेतर्फे सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी (ता. 1 ऑक्टोबर) दुपारी डिचोलीच्या मामलेदारांसमोर झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या अर्जावरील पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी ठेवण्यात आली आहे. शुक्रवारच्या सुनावणीवेळी महिला मिळून मयेतील 50 हून अधिक शेतकरी डिचोलीत एकवटले होते. सुनावणी झाल्यानंतर जुन्या बसस्थानकावर शेतकरी एकत्रित आले. कामगार नेते आणि किसान सभेचे वकील ऍड. जतीन नाईक आणि एस. एस. नाईक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी किसान सभेचे स्थानिक नेते कृष्णा गडेकर, स्वयम कामत, राजन नाईक आदी उपस्थित होते. पुढील सुनावणीच्या दिवशी म्हणजेच येत्या ता. 25 रोजी सकाळी डिचोली शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.

Related Stories

No stories found.