गरज तिथे कामगिरी सुधारु; CM सावंत

भाजपाच्या सर्वे मध्ये ज्या ज्या काही कमतरता दिसून येतात त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गरज तिथे कामगिरी सुधारु; CM सावंत
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

Goa : 2022ची विधानसभा निवडणूक (Assembly elecation) ध्यानात घेऊन भारतीय जनता पक्षाने (Bjp Party) अंतर्गत सर्वे केलेला आहे. काही महिन्यानंतर पुन्हा सर्वे केला जाणार आहे . भाजपाच्या सर्वे मध्ये ज्या ज्या काही कमतरता दिसून येतात त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील सर्वेमध्येही पुन्हा त्या मतदार संघामध्ये काही कमतरता दिसून आली तर शक्य तिथे व्यहरचनेत काही बदलही होतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केले.

Goa CM Pramod Sawant
Braking News: शक्ती सिन्हा यांचे निधन

पणजी येथील बाल भवनमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सर्वे कोण करतो व कशा पद्धतीने करतो यावर बरेच काही अवलंबून असते. काही सर्वे अवघ्याच लोकांची मते विचारात घेऊन केले जातात . प्रत्यक्ष मतदारांसमोर जाऊन व जास्तीत जास्त लोकाशी संपर्क साधून केलेल्या सर्वेला बरेच महत्त्व असते. भारतीय जनता पक्ष नेहमीच मतदारांच्या संपर्कात असतो.भाजपाचे विविध विभाग मतदारांच्या संपर्कात राहून मतदारसंघाचा एकूणच आढावा घेत असतात. भाजप त्यानुसार गरज तिथे बदल घडवते. असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Goa CM Pramod Sawant
कला अकादमीचे बांधकाम नियम धाब्यावर बसवून दुर्गादास कामतांची गोवा खंडपीठात धाव

एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेमध्ये उत्तर गोव्यातील भाजपाचे अनेक आमदार व असुरक्षित असल्याचे म्हटले होते . सरकारात बदल हवा का ? याला पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकांनी हो म्हटले. तर सरकारचे काम कसे वाटते ? या प्रश्नाला ५० टक्के पेक्षा जास्त लोकांनी चांगले आहे. म्हटल्याचे हा सर्वे सांगतो. मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांना सर्वात जास्त लोकांची पसंती आहे. त्यामुळे या सर्वेतून नेमकी स्थिती स्पष्ट होताना दिसत नाही. या विषयावर आज मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की निवडणुका जसजशा जवळ येतील तसे आणखीनही सर्वे केले जाणार आहेत. मात्र सर्वे कोण व कशाप्रकारे करतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. भाजप हा नेहमीच मतदारसंघांचा आढावा घेऊनच पुढील व्यूहरचना आखत असतो असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com