पत्रादेवी तपासणी नाक्यावर १७ लाखांची बेकायदा दारू जप्त

प्रतिनिधि
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर काल संध्याकाळी पेडणे अबकारी कार्यालयाने गुजरात राज्यात जाणारी सोळा चाकी लॉरी ताब्यात घेऊन १७ लाख रुपयांची बेकायदा दारू जप्त केली. त्यात विविध प्रकारच्या मद्याचा समावेश आहे.

पेडणे:  पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर काल संध्याकाळी पेडणे अबकारी कार्यालयाने गुजरात राज्यात जाणारी सोळा चाकी लॉरी ताब्यात घेऊन १७ लाख रुपयांची बेकायदा दारू जप्त केली. त्यात विविध प्रकारच्या मद्याचा समावेश आहे.

काल संध्याकाळच्या सुमारास जीजे ०६- एव्ही ७८८७ या क्रमांकाची सोळा चाकी लॉरी तपासणीसाठी थांबविली असता त्यात दारूच्या पेट्या असल्याचे निदर्शनास आले. चालकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता तो कागदपत्रे सादर करू न शकल्याने लॉरीसह दारु जप्त केली. या प्रकरणी चालक विरेंद्रकुमार व वाहकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पेडणे अबकारी कार्यालयाच्या निरीक्षक सुरेखा गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर लोलयेकर, कारकून वसंत नाईक, रक्षक दिगंबर कुंकळकर, बिंदेश पेडणेकर, ॲसीस फर्नाडिस, विश्वास कुडणेकर, अर्जुन गावस, रामा बगळी, नितेश मळेवाडकर, नितीन परब, दशरथ तारी, प्रसाद नाईक, सर्वेश नाईक यांनी ही कामगिरी बजावली. महिन्याभरात मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू पकडण्याची ही दुसरी घटना आहे. १३ सप्टेंबरला पत्रादेवी येथे तपासणी नाक्यावर अशाच ट्रकमधून मुंबईला नेण्यात येणारी १३ लाख रुपयांची दारु पेडणे अबकारी कार्यालयाने जप्त केली होती.

संबंधित बातम्या