Goa Panchayat Election: पेडणे पंचायत निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी '5' उमेदवारी अर्ज दाखल

Goa Panchayat Election: पंचायत निवडणुकीसाठी 29 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

Goa Panchayat Election: पेडणे तालुक्यातील कासारवर्णे, हळर्ण व चांदेल हंसापूर या तीन पंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी 5 अर्ज दाखल झाले आहेत. चांदेल हंसापूर पंचायतीसाठी तीन तर इतर दोन पंचायतीसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. 29 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.

हळर्ण पंचायतीच्या प्रभाग 2 मधून विनोद यशवंत हरिजन, कासारवर्णे पंचायतीच्या प्रभाग 4 मधून प्रियंका प्रशांत परब तर चांदेल - हंसापूर पंचायतीच्या प्रभाग 2 मधून नेहा नागेश मळीक व गौरी नवसो मळीक तसचे प्रभाग 3 मधून कॅश्‍मीर रॉकी डिसोझा यांचा काल उमेदवारी अर्ज सादर केलेल्यांमध्ये समावेश आहे.

मतदान 9 डिसेंबरला, तर मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. तिन्ही पंचायतीमधील 17 प्रभागांतील उमेदवारांना निवडण्यासाठी साठी 4388 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

30 रोजी अर्जांची छाननी

22 ते 29 अर्ज भरण्याची मुदत असून 30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी. 1 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून त्यांना निवडणूक चिन्ह वितरित केले जाणार आहे. पहिल्या दिवशी कमी अर्ज आले असले तरी पुढील काही दिवसांत प्रत्येक प्रभागामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com