Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल- डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDainik Gomantak

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या तीन दिवसांपासून स्थिर आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बरेच बदल झाले आहेत. आज उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदललेले नाहीत.

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे आज पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त होऊन 96.60 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 16 पैशांनी घसरून 89.77 रुपये प्रति लिटर झाले आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 16 पैशांनी महागले आणि ते 109.46 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 15 पैशांनी वाढून 94.61 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 13 पैशांनी वाढून 96.97 रुपये प्रति लिटर तर डिझेल 12 पैशांनी घसरून 89.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

Goa Petrol-Diesel Price
Indian Railways: रेल्वेचा मोठा निर्णय, आता जनरल तिकीटाने करता येणार स्लीपरमध्ये प्रवास !

गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.22

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 89.97

Goa Petrol-Diesel Price
PM Kisan 13th Installment: बजेटपूर्वी 13 व्या हप्त्याबाबत आली मोठी अपडेट, मिळणार 4000 रुपये!

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com