Ravi Naik Statement On Environment: आपला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी योगदान द्यावे

Goa Environment: कृषी खात्यातर्फे मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती ; पाणी वाचवा... जमिनी सांभाळा!
Ravi Naik | Goa News
Ravi Naik | Goa News Dainik Gomantak

Ravi Naik: पाणी हेच जीवन असून पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्यभावनेने कार्य करायला हवे, आणि आपला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी योगदान द्यावे, असे सांगताना पाणी वाचवा आणि जमिनी सांभाळा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले.

फोंड्यात कृषी खात्यातर्फे राज्यभरात आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीचे काल स्वागत करण्यात आले. येथील क्रांती मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला कृषिमंत्री रवी नाईक, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफोन्सो तसेच फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक, चंद्रकला नाईक उपस्थित होते.

रवी नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पाण्यासाठी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडणे होणार आहेत, पाणी मिळवण्यासाठी होणारी ही भांडणे रोखण्यासाठी आताच प्रयत्न व्हायला हवेत. पाणी हे जीवन आहे आणि माती हे आपले अस्तित्व आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतील, तर प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने काम करायला हवे.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आपल्या पूर्वजांनी पाणी आणि जमीन वाचवली, पण आताची पिढी पाण्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि जमिनी कवडीमोलाने विकत आहेत. पाणी हे जीवन आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेऊन त्याचा वापर करायला हवा आणि जमिनी विकण्याचे सोडून त्या कसायला हव्यात, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने काम करण्याची आज खरी गरज असल्याचे सांगितले.

Ravi Naik | Goa News
Goa Latest News: 'नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य शिक्षण ही काळाची गरज' - चंद्रकांत शेट्ये

आमदारांनी घेतला रॅलीत सहभाग

पाणी आणि जमीन वाचवा मोहिमेचे कृषी खात्याने सुरेख नियोजन केले होते. पेडणे ते काणकोणपर्यंत पाणी वाचवा, जमिनी वाचवाचा संदेश देत शंभरपेक्षा जास्त मोटारसायकलवाल्यांनी दौरा केला.

विशेष म्हणजे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मोटारसायकलवर स्वार होत या रॅलीत सहभाग गेतला. वाटेत अनेक ठिकाणी संबंधित मतदारसंघातील आमदार व मंत्र्यांनी या रॅलीचे स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com