गोव्यात सहा महिन्यांत पिंक फोर्सला 1462 कॉल्स

या पिंक फोर्ससाठी आठ वाहने कार्यरत असून 54 महिलांची नियुक्ती करण्यात आली आहेत.
Goa Pink Force
Goa Pink Force Dainik Gomantak

पणजी : राज्यातील विविध पोलिस स्थानकाशी संलग्न असलेल्या व महिलांच्या तसेच मुलांच्या समस्येसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘पिंक फोर्स’ला गेल्या सहा महिन्यात 1462 कॉल्स आहेत. त्यातील बहुतेक कॉल्स हे कौटुंबिक हिंसा तसेच मदतीसाठी आले आहेत. त्यातील 90 टक्क्यांहून अधिक कॉल्सची चौकशी करून ते निकालात काढण्यात आले आहेत अशी माहिती विधानसभेतील अतारांकित प्रश्‍नावर देण्यात आली आहे.

या पिंक फोर्ससाठी आठ वाहने कार्यरत असून 54 महिलांची नियुक्ती करण्यात आली आहेत. ही वाहने 24 तास कोणत्याही क्षणी कॉल घेण्यास तयार असतात. या पिंक फोर्सच्या महिला पोलिसांना अडचणीत असलेल्या महिलांशी सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची अधिक वर्दळ असते व महिलांना छेडछाडीची प्रकरणे घडण्याची शक्यता असते त्या ठिकाणी पिंक फोर्सची वाहने उभी केलेली असतात. सध्या ही वाहने राज्यातील प्रमख शहरामध्ये तैनात करण्यात आली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी याचा वापर करण्यात येत आहे. काही महिला तणावाखाली असतात व त्याना मदतीची गरज असते अशावेळी तिने पिंक फोर्स केंद्राशी संपर्क साधल्यास त्वरित तिला सहकार्य देण्यात येते. महिला व मुलांवरील गुन्हे रोखण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.

Goa Pink Force
Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

मोकळ्या जागेत महिलांशी गैरवर्तणूक करत असल्याचे आढळून आल्यास त्यासंदर्भातची माहिती जवळच्या पोलिस स्थानकाला देऊन त्या महिलेच्या सुरक्षिततेची दखल घेतली जाते. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः महाविद्यालये, शाळा, पर्यटन स्थळे या ठिकाणी पिंक फोर्सला गस्ती घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिस खात्याच्या महिला कक्षाच्या अधीक्षक व उपअधीक्षकांच्या देखरेखीखाली त्या कार्यरत आहेत.

वेळेत महिलांच्या मदतीसाठी जाणाऱ्या या पिंक फोर्सच्या कामगिरीचीही दखल घेऊन त्याचा आढावा घेतला जातो. अचानक कोणत्याही प्रकाराला सामोरे जाण्यासाठी या वाहनामध्ये लाठी, बॅटरी, शिल्ड, हँड ग्लोस, फेस मास्क, रिफ्लेक्टिव्ह जॅकेटस् व प्रथमोपचाराची औषधे ठेवण्यात येते. या पिंक फोर्सवर रात्रीच्यावेळी त्यांची तत्परता तपासणीचेही निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालकांनी काढलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com