Goa: वृक्षारोपण मर्यादित न ठेवतां नियमीतपणे असावे...

स्वातंत्र्यदिनापर्यंत किमान 200 रोपटी लावण्याचा संकल्प (Goa)
Goa: वृक्षारोपण मर्यादित न ठेवतां नियमीतपणे असावे...
Omkar Malvankar and other activists of Anjuna - Cayasuve Youth Association planting tree, in GoaSantosh Govekar / Dainik Gomantak

वृक्षारोपणाचा (Plantation) कार्यक्रम वर्षातून एक दिवसापुरतां मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपापल्या जागेत महिन्यातून किमान एक तरी रोप लावावे, असे आवाहन 'हणजूण - कायसुव (Anjuna - Caisuvem) युथ असोशियशन'चे  ओंकार मालवणकर यांनी शापोरात (Chapora) येथे केले. येथील प्रसिद्ध पुरातन किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण केल्यानंतर मालवणकर स्थानिक पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी स्थानिक तरुण कार्यकर्ते ओंकार मालवणकर यांनी येत्या पंधराऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत (Independence Day) हणजूण - कायसुव परिसरात औषधी तसेच इतर वनस्पती (Medicinal & Other Plants) अशी एकूण 200 रोपटी लावण्याचा संकल्प शापोरा युथ असोसीएशन ने केला. (Goa)

 Omkar Malvankar and other activists of Anjuna - Cayasuve Youth Association planting tree, in Goa
संतापजनक: दुभत्या म्हशींवर झाडल्या गोळ्या

दरम्यान, शापोरा येथील किल्ला हा जागतिक वारसा केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पुरातत्व खात्याचे या किल्ल्यावर पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मालवणकर यांनी यावेळी केला, तसेच किल्ल्यावर पर्यटकांकडून होत असलेला धांगडधींगाणा तसेच परिसरातील अस्वच्छता रोखण्यासाठी या जागेत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली. यावेळी शापोरा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष बलभीम मालवणकर व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.