Goa Burglary Case: ड्रायव्हरनेच केली घरात चोरी, सव्वा चार लाख रुपयांचे दागिने विकले सोनाराला

शहजाद शेख रेहान यांची जी गाडी चालवत होता त्या गाडीच्या चावीच्या गुच्छात फ्लॅटचीही चावी होती
Goa Burglary Case
Goa Burglary CaseDainik Gomantak

Goa Burglary Case: पंटेमळ कुडचडे येथील रिहान शेख यांच्या फ्लॅटमधून सुमारे चार लाख सव्वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले. धक्कादायक बाब म्हणजे शेख यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच ही चोरी केली.

कुडचडे पोलिसांनी संशयित आरोपी शहजाद शेख याला अटक केली असून सुमारे चार लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

Goa Burglary Case
Goa Harassment Case: फ्लॉईड कुतीन्हो कथित छळ प्रकरण; धनिया, एकोस्कर यांच्या चौकशीचे आदेश

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 20 ते 24 डिसेंबर दरम्यान पंटेमळ येथील ग्राउंड व्ह्यू अपार्टमेंटमध्ये रेहान शेख यांच्या फ्लॅट मधून सोन्याचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी शेख यांनी दि. 17 जानेवारी रोजी कुडचडे पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार कुडचडे पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली असता सदर इमारतीत तळमजल्यावर राहणाऱ्या रेहान यांचा चालक शहजाद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीने गुन्हा काबुल केला आहे.

Goa Burglary Case
Goa: गोव्यात लेट नाईट पार्टी आणि मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी द्या- सरकारचे केंद्राला पत्र

शहजाद शेख रेहान यांची जी गाडी चालवत होता त्या गाडीच्या चावीच्या गुच्छात फ्लॅटचीही चावी होती व त्याच चवीने फ्लॅटचा दरवाजा उघडून आतील सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपण चोरले होते असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

चोरीस गेलेले सोन्याचे दागिने स्वतःचे असे सांगून शहजाद यांनी वास्को व कुडचडे येथील एका सोनाराला विकण्यात आले होते ते पोलिसांनी जप्त केले असून शहजाद याला केपे न्यायालयापुढे उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी कुडचडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com