‘दीनदयाळ’च्या गाड्यांना विरोध, BJP नेत्यांसह 17 जण पोलिसांच्या ताब्यात

भाजपचे (BJP) 7 आंद्रेचे नेते प्रा. रामराव वाघ व सामाजीक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यासह 17 जणांना पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले.
‘दीनदयाळ’च्या गाड्यांना विरोध, BJP नेत्यांसह 17 जण पोलिसांच्या ताब्यात
Goa police arrested 17 people, including Ramrao Wagh and social activist Rama Kankonkar BJP leaderDainik Gomantak

पणजी: बांबोळी (Bambolim) येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयासमोरील (GMC) जागेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गाडे स्थापन करण्यास विरोध केल्या प्रकरणी भाजपचे (BJP) 7 आंद्रेचे नेते प्रा. रामराव वाघ व सामाजीक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यासह 17 जनांना पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले.

या बाबत सविस्तर हकीगत अशी की गोमेकॉ समोरील गाडे न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनानेदोन महिन्यापुर्वी हटवले होते. व त्यांना इतरत्र नवे गाडे बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. या प्रकरणी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडीस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सविस्तर आराखडाही तयार केला होता. गोमेकॉच्या आवारात गाडे बांधून देण्याचे आश्‍वासन दिल्याचा दावा गाडेचालक करत आहेत. या जागेतीलच सरकारने दिनदयाळ योजनेखालील दिलेले 5 गाडेही सर्वासोबतच हटवले गेले होते.

Goa police arrested 17 people, including Ramrao Wagh and social activist Rama Kankonkar BJP leader
Goa: बागातील दुर्घटनेनंतर न्हावेलीतील घटनेला उजाळा

हे पाच गाडेचालक उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला त्यांचे गाडे स्थापण्यास जागा देण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज पहाटे प्रशासनाचे अधिकारी पोलिस फाट्यासह गोमेकॉ परिसरात ते पाच गाडे वाहनातून घेऊन गेले असता गाडे हटवलेल्या इतर गाडेचालक लोकांनी सदर गाडे वाहनातून खाली उतरवण्यास विरोध केला. आम्हांला अगोदर गाडे द्या. जागा नक्की करा, व नंतरच हे गाडे येथे घाला. अशी जोरदार मागणी गाडे चालकांनी गेली. व सर्वजन गाडे आणलेल्या ट्रकासमोर झोपले. सरकारी अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालायचे आदेश असल्याचे सांगूनही कुणीच हटत नव्हते. रामा काणकोणकर व प्रा. रामराव वाघ यांनी न्यायालयाचे आदेश सादर करा. असी मागणी करत गाडेचालकांना पाठिंबा दिल्या. शेवटी पोलिसांनी प्रा. वाघ व काणकोणकर यांच्यासह 17 जनांना पोलिस वाहनात घालून नेले.

Goa police arrested 17 people, including Ramrao Wagh and social activist Rama Kankonkar BJP leader
Goa: कोरोनाकाळात बंद झालेली क्रूज सेवा पुन्हा सुरु

आमदारांच्या घरी बैठक

ज्या गाडेचालकांना पोलिसांनी नेले नाही ते सर्व सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडीस यांच्या घरी पोचले. त्यावेळी झालेल्या बैठकीत आमदार फर्नांडीस यांनी काही काळ कळ सोसा. मुख्यमंत्र्यानी आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार सर्व गाडेचालकांचे पुर्नवसन होणार असल्याचे सांगितले. गाडेचालकांनी लवकरात लवकर पुर्नवसन करण्याची मागणी केली. आमदार फर्नाडिसवर आमचा विश्‍वास असल्याचेही गाडेचालकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.