गोवा पोलिसांची सिनेस्टाईल धरपकड

शिवोलीत सहा नायजेरियन पाठलागानंतर जेरबंद
Goa Police Arrested Six Nigerian in Siolim
Goa Police Arrested Six Nigerian in Siolim Dainik Gomantak

शिवोली : तारची-भाट, शिवोली येथील श्री गणेश मंदिर परिसरात ॲस्ट्रो टर्फ ग्राउंडवर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हणजूण पोलिसांकडून टाकलेल्या छाप्यात सहा नायजेरियन तरुणांना बेकायदा वास्तव्य करून राहिल्याबद्दल ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना पाहताच नायजेरियन तरुणांनी मिळेल त्या वाटेने पळापळ सुरू केल्याने पुढे नायजेरियन आणि मागे पोलिस, असे सिनेस्टाईल दृष्य पाहावयास मिळाले.

तारची भाट येथे अजीत आगरवाडेकर यांच्या मालकीच्या ॲस्ट्रो टर्फ ग्राउंडवर गेल्या आठवड्यापासून बार्देशातील विविध ठिकाणचे नायजेरियन तरुण खेळाच्या सरावासाठी येतात. याठिकाणी कायदेशीर कागदपत्रांअभावी बेकायदा वास्तव्य करून राहाणारे नायजेरियन तरुण येणार असल्याची माहिती हणजूण पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी 25 पोलिसांच्या मदतीने या भागात शनिवारी पहाटेच तळ ठोकला.

Goa Police Arrested Six Nigerian in Siolim
गोव्यात पेट्रोलची 104 रु. प्रती लिटरने विक्री

साडेआठच्या सुमारास हे सहाही नायजेरियन तरुण खेळाच्या सरावात मग्न असताना पोलिसांनी मैदानाला वेढा घातला. त्यातील काहीजणांनी मिळेल त्या वाटेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यातील डियोन रॉबर्ट आल्बर्ट (31-पर्रा) ऊखे जॉय ओकाफोर (36- ओशेल), ईबुका चिउबा गॉडवीन ओबिक्मे (37-पर्रा) यांना यापूर्वी हणजूण पोलिसांकडून अटक झाली होती.

तथापि, ओमिबोर मायकल ओक्वुदिली (23) याला अन्वेषण विभागाने यापूर्वी अटक केली होती. या चार नायजेरियन तरुणांव्यतिरिक्त जोजफ नुडूलू (39-शिवोली) आणि ईमान्युअल आलुमा (32) या सहा नायजेरियन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली.

Goa Police Arrested Six Nigerian in Siolim
राहुल गांधींची गोवा दौरा रद्द होणार

बेकायदा राहणाऱ्यांची माहिती द्या

हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस यांनी शिवोली पंचक्रोशीत बेकायदा वास्तव्य करून राहाणाऱ्या नायजेरियनांसह विदेशी लोकांची तात्काळ पोलिस स्थानकात माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती देणाऱ्यांचे नाव, पत्ता गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com