दागिने व रोख रक्कम चोरीप्रकरणी महिलेला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

अटक केलेल्या महिलेचे नाव रत्नमाला चंद्रशेखर ओगुरू असे आहे. ती सध्या कुर्टी - फोंडा येथे राहत असून मूळची आंध्रप्रदेश येथील आहे.

पणजी: दोन आठवड्यापूर्वी कुर्टी- फोंडा येथील फ्लॅटमधील महिलेला व तिच्या मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवून ६.१५ लाखांचे सोन्याचे दागिने व ३८ हजारांची रोख रक्कम मिळून सुमारे ६.५३ लाखांचा ऐवज चोरलेल्या महिलेल्या फोंडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. तिच्याकडून ६ लाखांचे दागिने तसेच १९,२५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. 

अटक केलेल्या महिलेचे नाव रत्नमाला चंद्रशेखर ओगुरू असे आहे. ती सध्या कुर्टी - फोंडा येथे राहत असून मूळची आंध्रप्रदेश येथील आहे.

संबंधित बातम्या