गोवा पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष सावंतांची आत्महत्या

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष सावंत यांनी पर्वरी येथील पोलिस वसाहतीतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

पणजी: पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष सावंत यांनी पर्वरी येथील पोलिस वसाहतीतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. मानसिक तणावचे बळी ठरल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. सध्या ते आल्तिनो -पणजी येथील गोवा राखीव पोलिस दलात कार्यरत होते व पर्वरी येथील एकमजली फ्लॅटमध्ये ते राहत होता.

काल रात्री 10.30. वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरात त्याचे कुटुंब होते मात्र ते सगळे तळमजल्यावर तर ते एकटेच पहिल्या मजल्यावर होते. त्यांने आतून खोलीची कडी लावून घेतली होती. त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने कुटुंबियांनी दार ठोठावले. त्यानंतर दार तोडले असता ते पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी पर्वरी पोलिसानी पंचनामा केला आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

दत्तप्रसाद नाईकांची गोवा भाजपच्या प्रवक्ते पदावरून मुक्तता 

संबंधित बातम्या