Goa : पोलिस इफ्फीत व्यस्त; संधी साधत गोव्यात चोरट्यांची लुटालूट

मडगावात एटीएम लुटलं; तर डिचोलीत एकाच इमारतीत चार कार्यालये फोडली
Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak

Goa Police : गोव्यात सध्या इफ्फी म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु आहे. मोठा पोलीस फौजफाटा हा सुरक्षेच्या कारणामुळे पणजीत तैनात करण्यात आला आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांनी गोव्यात लुटालुट सुरु केली आहे. एकाच रात्रीत मडगावात चोरट्यांनी एटीएम पळवलं, तर दुसरीकडे डिचोलीत एका इमारतीतील चार कार्यालयंही फोडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकीकडे सेलिब्रिटींची सुरक्षा तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

फोंड्यातील एटीएम लुटीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दक्षिण गोव्यात चोरट्यांनी मडगावातील एटीएम फोडलं आहे. बुधवारी 23 नोव्हेंबर रोजी रात्री रावणफोंड मिलिटरी कॅम्प जवळ असलेल्या ICICI बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी उखडून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेत सुमारे सात लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चोरट्यांनी हे ATM मशीन फोडून आत असलेली रक्कम पळवली असे तक्रारीत म्हटले आहे. फोडलेले रिकामे मशीन चोरट्यांनी दोन किमी अंतरावर असलेल्या नेसाय येथील रेल्वे पुलाजवळच्या झाडीत फेकून दिले. 

Goa Crime
Margao: चोरट्यांनी थेट एटीएम मशिनच चोरली, दोन किलोमीटर लांब नेत पैसे....

दुसरीकडे डिचोली शहरातील एकाच इमारतीतील तीन सरकारी मिळून चार कार्यालये फोडण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'टाऊन सेंटर' या इमारतीतील रस्ता वाहतूक, कामगार निरीक्षक, नगर नियोजन खात्याच्या कार्यालयांसह नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय फोडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

अज्ञात चोरांनी इमारतीत आत प्रवेश करून चारही कार्यालयांच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश मिळवला. या इमारतीच्या तळमजल्यावरील गोवा राज्य सहकारी बँकेला लागून असलेल्या पायऱ्यांवरून चोरांनी इमारतीत प्रवेश केल्याचा संशय आहे. पायऱ्यांची गेट उघडलेल्या अवस्थेत होती. मात्र चोरांच्या हाती मोठे घबाड लागले नसल्याचे माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com