कोलवाळ जेलमध्ये कैदी अडकला स्वतःच्याच जाळ्यात, दोनदा पलायन, तिसऱ्यांदा डाव फसला

याच कैद्याने यापूर्वी दोनवेळा कारागृहातून पलायन केले होेते आणि पुन्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती.
कोलवाळ जेलमध्ये कैदी अडकला स्वतःच्याच जाळ्यात, दोनदा पलायन, तिसऱ्यांदा डाव फसला
Goa: Police caught prisoner escaping from Colvale jail Dainik Gomantak

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील खोलीत भिंतीला भगदाड पाडून पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचा डाव दक्ष जेलरमुळे फसलाआहे. विशेष म्हणजे, याच कैद्याने यापूर्वी दोनवेळा कारागृहातून पलायन केले होेते आणि पुन्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात कैदी रामचंद्रन यल्लाप्पा याला जेलरने रंगेहात पकडल्याने त्याचा पलायनाचा प्रयत्न फसला. (Goa: Police caught prisoner escaping from Colvale jail)

यापूर्वीही यल्लाप्पाने या कारागृहातून दोनवेळा पलायन केले होते. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. कारागृहातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैदी यल्लाप्पा याने गेल्या कित्येक दिवसांपासून राहात्या खोलीतील भिंतीला भगदाड पाडण्याचे काम सुरू केले होते. खोदकाम केलेला भाग कोणालाही दिसणार नाही, अशा रितीने झाकून ठेवत होता. कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक सध्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार कारागृहातील जेलरकडे देण्यात आला आहे. या जेलरने कैद्यांच्या खोल्या तसेच शौचालयाच्या तपासणीचे सत्र सुरू केले होते. येथील कैद्यांना सकाळी थोडा वेळ मोकळ्या हवेमध्ये सोडण्यात येते. त्यावेळी कैदी यल्लाप्पा हा बाहेर न जाता खोलीच्या भिंतीला भगदाड पाडत असे. काल सकाळी जेलर खोल्यांमध्ये गेले असता त्यांना कसला तरी आवाज येत असल्याचे कानी पडले. त्यावेळी यल्लाप्पा हा भिंतीला भगदाड पाडण्याचा प्रयत्न करत होता.

पाळोळे येथे एका ब्रिटिश महिलेवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 2018 साली यल्लाप्पाला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध या गुन्ह्याव्यतिरिक्त कारागृहातून पलायनाचे दोन वेगवेगळे गुन्हे तसेच गोव्यात घरफोड्या, चोऱ्या व बंगळुरूमध्ये जबरी चोऱ्यांचे गुन्हे नोंद आहेत. त्याला कारागृहात स्वयंपाक कक्षात कामासाठी ठेवले होते. त्याचा फायदा उठवून त्याने 2019 व 2020 साली दोनदा पलायन केले होते.

Goa: Police caught prisoner escaping from Colvale jail
भारती सामंत यांचा खूनच,अहवालातून धक्कादायक माहिती उघड

कारागृहातून पलायन केल्यानंतर यल्लाप्पाने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या. त्याने चालक म्हणूनही काम केले. तसेच साथीदारांबरोबर गुन्ह्यांमध्येही सामील झाला होता. मात्र, अटकेच्या भीतीने वारंवार राज्य बदलत होता. गोवा पोलिसही त्याच्या मागावर होते. अखेर त्याला हॉस्पेट (कर्नाटक) येथे अटक करण्यात क्राईम ब्रँचला यश आले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com