Goa Crime: अल्पवयीन युवतीवरील बलात्कार प्रकरणी पोलिस कॉन्टेबलला 10 वर्षे सश्रम कारावास

पणजी जलदगती विशेष न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Jail
JailDainik Gomantak

अल्पवयीन युवतीचे अपहरण करत बलात्कार केल्याप्रकरणी एका माजी पोलिस कॉन्टेबलला पणजी जलदगती न्यायालयाने आज दोषी ठरवले. न्यायालयाने माजी पोलीस कॉन्टेबल सिद्धार्थ गोसावी याला 10 वर्षे सश्रम कारावास तसेच 1.15 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

(goa police constable sentenced to 10 years imprisonment in the case of rape )

मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय पिडीत मुलीने 16 जून 2018 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आपल्यावर एका अल्पवयीन मुलाने आणि आरोपी सिद्धार्थ गोसावीने लैंगिक अत्याचार केले. या व्यतिरिक्त आरोपीने अपहरण करून उत्तर गोव्यात आपल्या नातेवाईकाकडे ठेवले होते व रात्री घरी सोडण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार वास्को पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते.

Jail
The Purple Fest 2023: आगळ्यावेगळ्या ‘द पर्पल फेस्ट’चे पर्वरी येथे आयोजन

पिडीतेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार वास्को पोलिसांनी 17 जून 2018 रोजी आरोपी गोसावीला अटक केली. आरोपी विरोधात भादसंच्या कलम 376, 363, 323 आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा 2012 (पॉक्सो) कायद्याच्या 4 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Jail
Goa Corona Update: गोव्यात आज केवळ 7 नवे कोरोना रूग्ण, 10 जणांना डिस्चार्ज

वकीलाकडून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी

चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण पॉक्सो कायद्यांतर्गत येत असल्यामुळे जलदगती विशेष न्यायालयात (मॉक्सो) वर्ग करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने सुनावणी पूर्ण करत आरोपीला दोषी ठरविले. तसेच मारहाणीचे पुरावे नसल्यामुळे आरोपी विरोधात दाखल केलेले भादंसंच्या कलम 323 रद्द केले. या प्रकरणाचा आज निकाल लागला असून पणजी येथील जलदगती न्यायालयाने गुन्हेगाराला दोषी ठरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com