
Goa Police control room received an anonymous call
गोवा पोलिसांची तारांबळ उडवणारा एक प्रकार समोर आला आहे. गोवा पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज एक निनावी कॉल आला असून शिवोलीतील हॉलीक्रॉस परिसरात मुलीचा कथित खून झाला असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाला सुरुवात केली, पण त्यानंतर वेगळेच सत्य त्यांच्यासमोर आले
अज्ञात व्यक्तीने कंट्रोल रूमला कॉल करून शिवोलीतील हॉलीक्रॉस परिसरात मुलीचा खून झाला असल्याचे सांगितले. यावर त्याने आपली ओळख सांगण्यास नकार दिला.
निनावी कॉल आल्यानंतर म्हापसा, कोलवाळ आणि हणजूण पोलीस पथक ताबडतोब या घटनेमागील सत्य शोधण्याच्या कामाला लागले. त्यानंतर फोन केलेल्या अज्ञात व्यक्तीबाबत माहिती घेण्यास सुरुवात झाली.
तपासाअंती फोन केलेल्या व्यक्तीचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना यश आले. त्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर ही सर्व माहिती खोटी असून त्याने दारूच्या नशेत पोलिसांना कॉल केला असल्याचे उघडकीस आले.
या व्यक्तीचे वय साधारण 35 ते 40 च्या दरम्यान असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने केलेल्या या बनावट कॉलमुळे पोलीस यंत्रणा काहीकाळ पूर्णपणे हादरून गेली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.