Goa Police Cup: गोवा पोलिस उपांत्यपूर्व फेरीत

शानदार कामगिरी: यंग बॉईज टोंक संघावर दोन गोलने मात
Goa Police Cup
Goa Police CupDainik Gomantak

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात दोन मिनिटांत लागोपाठ गोल नोंदवत यजमान गोवा पोलिस संघाने वर्चस्व राखले आणि त्या बळावर त्यांनी यंग बॉईज टोंक (वायबीटी) संघावर 2 - 0 फरकाने शानदार विजय नोंदविला. या कामगिरीसह त्यांनी 18 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही प्रवेश केला.

(Goa Police Cup Goa Police Quarter Final Selection)

Goa Police Cup
Congress: राज्यातील चेकपोस्ट सीसीटीव्ही दुरुस्त करा,भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होईल

सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्यातील पहिला गोल 31 व्या मिनिटास तुषार देसाई याने नोंदविला. नंतर 33 व्या मिनिटास प्रजत नाईक याने आघाडी वाढविली.

Goa Police Cup
Goa Corona Update: गोव्यात 1040 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 159 नव्या रूग्णांची नोंद

वायबीटी संघाने गोलसाठी प्रयत्न केले, पण गोवा पोलिसांचा भक्कम बचाव भेदणे त्यांना शक्य झाले नाही. यजमान संघाचा प्रजत नाईक सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आता गोवा पोलिस संघासमोर साळगावकर एफसी संघाचे आव्हान असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com