Goa Police सुरक्षा अन् वाहतूक हाताळण्यास सज्ज; रस्तेअपघात रोखण्यासाठीही ठोस पावले उचलणार

Goa Police: 'गोवा पोलिस स्थापनदिन' सोहळा काल पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: आगामी नाताळ सण व नववर्षासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबरोबरच स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी गोवा पोलिस सज्ज झाले आहेत. ड्रग्ज तसेच रस्तेअपघात रोखण्यासाठीही ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

प्रत्येक पोलिस स्थानकाची गस्ती वाहने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास तत्पर करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी काल गोवा पोलिस दल स्थापनादिन कार्यक्रमानंतर बोलताना दिली.

येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गोवा पोलिस स्थापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी पोलिस संचालनाची पाहणी केली व त्यानंतर परेड झाली.

Goa Police
Goa Club Case: वेश्‍यांचे प्रलोभन दाखवून क्‍लबमध्‍ये ओढून नेले; पैसे दिले नाहीत म्‍हणून केली मारहाण!

पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधीक्षक ते कॉन्स्टेबल पदापर्यंतच्या 53 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक इन सिग्निया पदक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला गोव्याच्या माजी पोलिस महानिरीक्षक तथा दिल्लीच्या विद्यमान संयुक्त पोलिस आयुक्त सुंदरी नंदा या खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिवाय पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, अधीक्षक अभिषेक धानिया, पोलिस खात्याचे अधिकारी व माजी अधिकारीही उपस्थित होते.

राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांच्या स्मतिप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी सुंदरी नंदा यांनी गोव्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानकासाठी चषक प्रदान केला. हा चषक कळंगुट पोलिस स्थानकाला देण्यात आला.

पोलिस स्थानकाचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी सदर चषक, रोख रु. 30 हजार तसेच प्रशस्तिपत्रक संयुक्त पोलिस आयुक्त सुंदरी नंदा यांच्या हस्ते स्वीकारले. सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानकाचा दुसऱ्या क्रमांकाचा मान वेर्णा पोलिस स्थानकाने पटकाविला. त्यांना चषक, रोख रु. 20 हजार व प्रशस्तिपत्रक मिळाले. तिसरा क्रमांक पणजी पोलिस स्थानकाला प्राप्‍त झाला.

वर्षभरात 135 ड्रग्‍ज प्रकरणे

सायबर गुन्हे ही देशातच नव्हे तर जगात मोठी समस्या बनली आहे. गोव्यात सायबर गुन्ह्यांचा तपास लावण्साठी अत्याधुनिक उपकरणे आहेत. गेल्या वर्षभरात अंमलीपदार्थविरोधी पथकाने ड्रग्जविक्रेत्यांना गजाआड करण्याची चांगली कामगिरी केली आहे.

वर्षभरात 135 प्रकरणांची नोंद करून 164 जणांना अटक केली तर विविध प्रकारचे 184 किलो ड्रग्ज जप्त केले. किनारपट्टी पोलिसांनी ‘सागर कवच’ मोहीम राबविताना बोगस अतिरेक्यांना त्यांचे लक्ष्य गाठण्यापासून प्रवृत्त करण्यात यशस्वी ठरले.

रस्ता सुरक्षा हे एक आणखी मोठे आव्हान आहे. गोव्यातील रस्ते पर्यटकांसाठी सुरक्षित आहेत. मात्र वाहने चालवताना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. नियम उल्लंघनप्रकरणी वर्षभरात सुमारे 17 कोटींचा दंड वसूल केला आहे, असे पोलिस महासंचालक जसपाल सिंग म्‍हणाले.

जसपाल सिंग, पोलिस महासंचालक-

गोवा पोलिसांची तपासकामाची टक्केवारी सुमारे 86 टक्के आहे. मानवी तस्करी रोखण्‍यासाठीचे प्रशिक्षण पोलिसांना देण्‍यात आले असून, त्‍याचा फायदा तपासात होत आहे. गोवा पोलिसांची स्वतःची एफएसएल लॅबोरेटरी आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासकामात मोठी मदत होत आहे. या एफएसएलमार्फत नौदल, खलाशी व फोरेन्सिक अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com