Goa Police: पुन्हा खाकी कलंकित! कुंकळ्ळी पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण निलंबित

Goa Police: हप्ते गोळा केल्याचा आरोप : दुसऱ्यांदा बडगा
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Police Inspector Tukaram Chavan suspended दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागातील व्यापाऱ्यांकडून हल्लीच बडतर्फ झालेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीने हप्ते जमा केल्याच्या कथित आरोपप्रकरणी कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना आज (गुरुवारी) रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

यापूर्वी काणकोण पोलिस स्थानकाचे निरीक्षक असताना त्यांना निलंबित करण्यात आले होते.

दुसरीकडे, बाणस्तारी अपघाताच्या रात्री मर्सिडीज कारच्या तोतया चालकाला सामोरे आणून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तसेच तपासात दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना म्हार्दोळ पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी सन्मानपूर्वक मोकळे सोडले, असे निरीक्षण करत ताशेरे ओढल्यानंतर पोलिस खात्याने म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे याची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन अल्बकर्क यांच्याकडे सोपवली आहे.

Goa Police
Mapusa: विवाहित महिलेचा पाठलाग आणि पतीला धमकी, IRB कॉन्स्टेबलला म्हापसा पोलिसांकडून अटक

काही महिन्यांपूर्वी कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक रजेवर असताना त्यांचा ताबा कुंकळ्ळीचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता.

या काळात चव्हाण यांचा कोलवा येथे त्यावेळी सेवेत असलेल्या बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल यांच्याशी संपर्क झाला.

या दोघांनी कोलवा किनारपट्टी परिसरातील काही व्यापाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हप्ते जमा करावे लागतील असे सांगून काहींकडून ते जमा केले होते. या पोलिसांच्या हप्ते जमा करण्याच्या प्रकरणाची चर्चा दक्षिण गोव्यात सुरू होती.

त्यामुळे निरीक्षक तुकाराम चव्हाण याच्यासह काही इतर पोलिसांचीही नावे घेतली जात होती. हे प्रकरण त्यानंतर दक्षिण गोव्यातील एका विरोधी पक्षाच्या आमदारापर्यंत पोहचले.

त्याने ते गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानावर घातले होते व राज्यात सुरू असलेल्या पोलिस हप्तेवसुलीवरून विचारणा केली होती.

Goa Police
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दर स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांत घट

या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन गेले व लगेच याप्रकरणी हालचाली सुरू झाल्या. प्रथमदर्शनी चौकशीत निरीक्षक चव्हाण यांचे बडतर्फ केलेल्या पोलिस कॉन्स्टेबल्सशी जवळचे संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार निरीक्षक चव्हाण यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला.

यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी प्रशासकीय कामातील हस्तक्षेपामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण केले. निरीक्षकाची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री पूनम पांडे हिने काणकोण तालुक्यातील चापोली धरणावर अश्‍लिल व्हिडिओ शूटींग केले होते. त्यावेळी काणकोणचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण होते. या अभिनेत्रीच्या व्यभिचारामुळे स्थानिकांनी आक्षेप घेऊन तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिस स्थानकावर मोर्चा नेला होता.

त्यावेळी निरीक्षक चव्हाण यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला होता. आंदोलनकर्त्यांनी तेव्हा निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी केली होती. निरीक्षकांनी गुन्हा नोंदवण्यास केलेल्या निष्काळजीपणामुळे त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले होते.

Goa Police
Mhadai Tiger Reserve: ठरले ! तीन मुद्यांद्वारे देणार व्याघ्र प्रकल्पाला आव्हान

गावडेंचीही चौकशी

1. बाणस्‍तारी अपघाताचा तपास क्राईम ब्रँचच्या विशेष पथकामार्फत सुरू आहे. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस निरीक्षक मोहन गावडे, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र गावडे आणि आकाश फडते यांच्या जबान्या नोंदवल्या आहेत.

2. या त्यांच्या जबान्यांतून अपघाताच्या रात्री सव्वादहाच्या सुमारास निरीक्षक गावडे हे २ पोलिस कॉन्स्टेबलसह कुंडई येथील औद्योगिक वसाहत जंक्शनजवळ पोहचले.

3. त्यानंतर परेश सावर्डेकर याच्यासह गणेश लमाणी, अमित पालेकर व इतर काहीजण आले. तेथे त्यांच्यात चर्चा झाली होती. यावेळी गणेश लमाणी हा कार चालवत होता, असे गावडे यांना सांगण्यात आले.

4. लमाणी यानेही तो कार चालवत होता असे सांगितले, तसेच ॲड. अमित पालेकर व इतरांनीही त्यांना लमाणी हाच चालक होता, असे पटवून दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com