Goa Police: गोव्यात हॉटेल-लॉजच्या इन, आऊटवर आता पोलिसांचे लक्ष? Pathik सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू

गोवा पोलिस यासाठी 'पथिक' हे अहमदाबाद पोलिसांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची मदत घेणार आहेत.
Hotel Room
Hotel Room Dainik Gomantak

Goa Crime News: गोव्यात पर्यटन हंगाम सध्या जोमात सुरू आहे. कोरोनाच्या संकटानंतर पर्यटकांचे गोव्याकडे येण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. तसेच, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण देखील जोर धरत आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोवा पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत राज्यात येणाऱ्या पर्यटक आणि अभ्यागतांची नोंद ठेवण्यासाठी आता तंत्रज्ञाची मदत घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

गोवा पोलिस यासाठी 'पथिक' हे अहमदाबाद पोलिसांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची मदत घेणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

Hotel Room
Watch Video: गोवेकर & पर्यटक दोघांत हाणामारी, पणजीत भर रस्त्यात झाला राडा

काय आहे 'पथिक सॉफ्टवेअर'?

अहमदाबाद पोलिसांनी पथिक या डिजिटल सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. शहरातील हॉटेल आणि लॉजमध्ये हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले आहे. यातून हॉटेल-लॉजमध्ये येणारे पर्यटक आणि अभ्यागत यांची डिजिटल पद्धतीने माहिती ठेवली जाते.

हीच माहिती जवळच्या पोलिस ठाण्याला देखील मिळते. अहमदाबाद पोलिसांनी सर्व हॉटेल-लॉजमध्ये हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यास बंधनकारक केले आहे.

पोलिसांना या सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक गुन्हे उघडकीस आण्यास मदत झाली आहे. असे अहमदाबाद पोलिसांनी म्हटले आहे.

Hotel Room
Valpoi: झाड कोसळल्याने वीज खांब पडला, शेळ- मेळावली येथील वीज पुरवठा खंडित

दरम्यान, नववर्षात पोलिसांच्या झालेल्या बैठकीत पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी पोलिसांना अनेक आव्हानांसाठी तयार राहण्याची सूचना केली.

राज्यातील अमली पदार्थ तस्करी, तापासाचा वेग वाढवणे आणि केस लांबणीवर पडणार नाहीत याची काळजी घेणे ही ध्येय 2023 मध्ये पोलिसांसमोर आहेत. असे जसपाल सिंग म्हणाले.

तसेच, पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींना प्राथमिकता द्यायला हवी, 5G तंत्रज्ञानामुळे आगामी काळात अमली पदार्थ आणि सायबर शाखेपुढे अनेक आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. असे सिंग म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com