Goa Police: अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

एक कोटीची खंडणी मागणाऱ्या पाच जणांच्या टोळीला आज गोवा पोलिसांनी शिताफीने अटक केली.
Goa police nab gang kidnapping minor girl
Goa police nab gang kidnapping minor girlDainik Gomantak

पणजी: अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी एक कोटीची खंडणी मागणाऱ्या पाच जणांच्या टोळीला आज गोवा पोलिसांनी (Goa Police) शिताफीने अटक केली. हा गुन्हा कोलवाळ येथील पोलीस स्थानकात नोंद झाला झाला आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद येणार आहेत. (Goa police nab gang kidnapping minor girl)

थिवी येथील प्लायवूड दुकानामधून काल भरदुपारी साडेबाराच्या सुमारास शस्त्रास्त्रे व चाकूचा धाक दाखवून नवीन पटेल या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केलेल्या पाचजणांच्या टोळीच्या आज गोवा पोलिसांनी २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या. त्यांनी या गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन तसेच चाकू जप्त केला आहे. पाचजणांपैकी दोघांना यापूर्वी अटक झाली आहे, तर इतर तिघांची पार्श्‍वभूमी तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी दिली.

Goa police nab gang kidnapping minor girl
Goa Police: अमलीपदार्थासह नायजेरियन तरुणांना अटक

हा गुन्हा केल्यानंतर संशयितांनी वाहनातून जुने गोवेच्या दिशेने जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या दोघा मजुरांचा मोबाईल हिसकावून नेला होता. या मोबाईलवरून बिरेंदर याने नवीन पटेल याच्या पत्नीला फोन करून तिच्या पतीच्या अपहरणाची माहिती देऊन सुटकेसाठी एक कोटींची मागणी केली होती. या मोबाईल क्रमांकांची माहिती शोधून बिरेंदर व निशांत या दोघांना काबेसा - सांताक्रुझ येथून अटक केली. त्यांनी गोवा वेल्हा येथील एका निर्जस्थळी एका इमारतीच्या आवारात नवीन पटेल याला ठेवल्याची माहिती सांगितली.

लगेच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत नवीन याला ताब्यात घेऊन इतर तिघांना अटक केली. या सर्व संशयितांना उद्या (६ ऑगस्ट) पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके करून २४ तासांच्या आतच अटक केली. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल महासंचालक मीणा यांनी बक्षीस जाहीर करण्यात येईल. संशयित निशांत मोगन हा नवीन पटेल याच्याकडे कामाला होता व काही महिन्यापूर्वीच त्याने काम सोडले होते. तो इतर संशयितांच्या संपर्कात आल्यानंतर पटेल याचे अपहरण करण्याचा पूर्वनियोजित कटामध्ये तोच सामील होता. त्यानुसार हे अपहरण केले गेले. मात्र, संशयितांनी वाटेत मोबाईल चोरून त्यावरून नवीनच्या पत्नीला केलेल्या फोनमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या संशयितांची गोव्यात तसेच त्यांच्या मूळ गावी गुन्हे दाखल आहेत का याचा शोध घेण्यात येत आहे.

Goa police nab gang kidnapping minor girl
Goa: कुडचडेत रुग्णवाहिकेवरून घमासान

बिरेंदर व निशान या दोघांवर वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे बिरेंदर कुमार याला या तपासकामात असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने ओळखले. या तपासकामासाठी पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व उपअधीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस निरीक्षक यांची वेगवेगळी पोलिस पथके स्थापन करून तपास करण्यात आला. पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी तपासकामांवर देखरेख ठेवत या अपहरणकर्त्यांना गजाआड करण्याची मोठी कामगिरी बजावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com