Goa Police: अमलीपदार्थासह नायजेरियन तरुणांना अटक

यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातील अंदाजे 94 हजारांचा मादक पदार्थ तसेच फेसिनो कंपनीची स्कुटर (क्र : जीए 03 -एएन 2662 ) ताब्यात घेतली.
Goa Police: अमलीपदार्थासह नायजेरियन तरुणांना अटक
NigerianDainik Gomantak

शिवोली: अमलीपदार्थ (drugs) विरोधात सुरु करण्यात आलेली जोरदार मोहीम चालु ठेवताना हणजुण पोलिसांनी गुरुवारी दुपारी हणजुणात घातलेल्या धाडीत चिजोबा ओकेके (35) या नायजेरियन (Nigerian) तरुणाच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पोलिसांनी (Police) त्याच्या ताब्यातील अंदाजे 94 हजारांचा मादक पदार्थ तसेच फेसिनो कंपनीची स्कुटर (क्र : जीए 03 -एएन 2662 ) ताब्यात घेतली.

Nigerian
Goa Police: पाच लाखाच्या चरससह रशियन नागरिकाला अटक

या कारवाईत हणजुण पोलीस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक स्नेहा सावळ, हेड कॉन्स्टेबल शामसुंदर पार्सेकर, कॉन्स्टेबल सुदेश भगत, राज परब, राजेश गोकर्णकर, तसेच गोधीश गोलतेकर यांनी भाग घेतला. दरम्यान, हणजुण पोलिसांकडून कुठल्याही परिस्थितीत पंचक्रोशीत अमली पदार्थाची देवाण घेवाण तसेच नायजेरियन लोकांचे बेकायदा वास्तव्य सहन करून घेतली जाणार नसल्याचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस (Suraj Gaonas) यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com