Goa Police अधिकाऱ्यांची समन्वय बैठकीत कडक भूमिका; ड्रग्‍स तस्करीविरोधात व्यूहरचना

Goa Police: गोव्यासह इतर राज्येही अंमलीपदार्थांचे विक्री केंद्रे बनत असल्याने ठोस पावले घेण्यात आली.
Goa Police
Goa Police Dainik Gomantak

Bureau of Narcotics Control: गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), महसूल दक्षता संचालनालय अशा विविध विभागांच्‍या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक काल पणजीतील पोलिस मुख्यालयात झाली.

दरम्यान, या बैठकीत किनारपट्टीच्या राज्यांत अंमलीपदार्थ तस्करीविरोधात (Smuggling) कडक भूमिका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटन हंगाम जवळ येत आहे. त्यापूर्वीच व्यूहरचना आखण्याबाबत मते व्यक्त करण्यात आली. गोव्यासह इतर राज्येही अंमलीपदार्थांचे विक्री केंद्रे बनत असल्याने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Goa Police
Pondaतील 7 पोस्टमनचा विषय तापला; पोस्ट कार्यालयावर धडक!

वाढती गुन्हेगारी व अंमलीपदार्थांची तस्करी या दोन प्रमुख विषयांवर सखोल चर्चा झाली. कर्नाटक, ओडिशा व महाराष्ट्रालगतील गोव्याला लागून असलेल्या जिल्ह्यांमधून ड्रग्‍सची तस्करी होते. पर्यटन हंगाम गोव्यात सुरू होण्यास पंधरवडाच बाकी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ड्रग्‍सची तस्करी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Goa Police
Goa Drugs Case : हिलटॉप क्लबचा मालक स्टीव्ह डिसोझाला हैदराबाद पोलिसांकडून अटक

तसेच, राज्यातील आणि राज्याबाहेरील सर्व यंत्रणांवर देखरेख व नजर ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला उपस्थित असलेले विविध राज्यांचे पोलिस अधिकारी तसेच इतर यंत्रणांना ड्रग्‍स तस्करीबाबत माहितीची देवाणघेवाण करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक जसपाल सिंग (Director General of Jaspal Singh)यांनी दिली.

जसपाल सिंग, पोलिस महासंचालक गोवा-

ड्रग्‍स तस्करीची माहिती प्रत्येक राज्याने वेळीच दिल्यास कारवाईसाठी लगेच पावले उचलणे व त्या ड्रग्‍समाफियांवर नजर ठेवणे सोपे होणार आहे. प्रत्येक राज्याने आपल्‍या सीमेवर ड्रग्‍सची तस्करी थोपविण्यासह कसून तपासणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com