सडा भागांतील घरात जुगार अड्डे

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

उघड्यावर किंवा दुकानात मटका जुगार अड्डे थाटल्यास पोलिस छापा घालू शकतात. हे जाणून सडा परिसरात घरातून मटका बीट घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुरगाव: उघड्यावर किंवा दुकानात मटका जुगार अड्डे थाटल्यास पोलिस छापा घालू शकतात. हे जाणून सडा परिसरात घरातून मटका बीट घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सडा परिसरात खुलेआम मटका जुगार खेळला जातो. पण मागील काही दिवसांपासून गुन्हा अन्वेषण विभागाने मटक्याचे अड्डे उध्वस्त करण्याची मोहीम सुरू केल्याने मटका जुगारवाले भांबावून गेले आहेत. त्यातच सातत्याने या जुगाराविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्याने मटका जुगार व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हा व्यवसाय चालू राहावा यासाठी जुगारवाल्यांनी शक्कल लढवत अड्डे आपल्या घरात थाटले आहेत. सडा भागात अशा प्रकारचे अड्डे अनेक घरातून चालल्याची माहिती मिळाली आहे.

मुरगाव तालुक्यातील सडा भागात मटका जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. मटका बीट घेणारे अड्डे पावलोपावली थाटले होते. पण, या गैरधंद्याविषयी दै. ‘गोमन्तक’ने आवाज उठविल्यावर जुगार अड्डे बंद करून ते आता घरातून सुरू ककरण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. Goa

संबंधित बातम्या