Goa: हरमल येथे एका रेस्टॉरंट छापा टाकून अमली पदार्थ जप्त
पेडणे पोलिसांनी नेपाळच्या रहिवाशाला केली अटक (Goa)Dainik Gomantak

Goa: हरमल येथे एका रेस्टॉरंट छापा टाकून अमली पदार्थ जप्त

पेडणे पोलिसांनी नेपाळच्या रहिवाशाला केली अटक

Goa: हरमल (Arambol) येथे आज (22 सप्टेंबर ) पेडणे पोलिसांनी भीम बलबहादूर या नेपाळी युवकाने (Nepali resident) 40 हजार किमतीचा अमली पदार्थ (Drugs) बाळगल्याप्रकरणी अटक केली. एका रेस्टरंटवर छापा टाकला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 40 हजार किमत असलेला ड्रग्स (Drugs of Rs 40 Thousand) जप्त केला.

पेडणे पोलिसांनी नेपाळच्या रहिवाशाला केली अटक (Goa)
Goa: पोरस्कडे न्हयबाग रस्त्याची स्थिती भयानक

पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांना पॅराईड्स केबिन (Pyarids Cabin Restaurant) रेस्टॉरंट आणि हॉटेल खालचावाडा हरमल मध्ये ड्रग्ज ऍक्टिव्हिटीची माहिती मिळाली. त्यानुसार पीआय दळवी स्वतः पीएसआय प्रफुल्ल गिरी, एलपीएसआय सुमेधा नाईक पीएसआय हरीश वैगुणकर, पीसी दयेश खांडेपार, पीसी विष्णू गड, पीसी भास्कर चारी यांच्यासह पोलिसांनी गुप्तपणे छापा टाकला, त्या ठिकाणी मादक द्रव्ये सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 40 हजार आहे.

पेडणे पोलिसांनी नेपाळच्या रहिवाशाला केली अटक (Goa)
बेळगावहून गोव्याला जाणारा ट्रक चोर्ला घाटात कलंडला

संशयित भीम बलबहादूर सौद, हा टेकापूर नेपाळ येथील रहिवासी आहे. त्याच्यावर पेडणे पोलिसांनी एन डी पी एस (N.D.P.S.) चा गुन्हा U/s 20 (b) (ii) A नोंदवून अनधिकृतपणे स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठीचा कायदा, 1985, चरस म्हणून ओळखले जाणारे मादक पदार्थ जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आणि सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. एसडीपीओ श्री गजानंद प्रभुदेसाई आणि एसपी उत्तर श्री शोबित सक्सेना आयपीएस यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com