बंदी असलेल्या कॅनाबिस औषधाची पर्वरीत सर्रासपणे विक्री
Drugs Dainik Gomantak

बंदी असलेल्या कॅनाबिस औषधाची पर्वरीत सर्रासपणे विक्री

आल्तो पर्वरी येथील कॅनाडोक क्लिनिकवर पर्वरी पोलिसांनी छापा; एकाला अटक

पणजी : गोव्यात बंदी असलेल्या कॅनाबिस औषधाची विक्री करणाऱ्या क्लिनिकचा पर्दाफाश झाला आहे. आल्तो पर्वरी येथील कॅनाडोक क्लिनिकवर पर्वरी पोलिसांनी छापा टाकत बंदी असलेल्या कॅनाबिस औषधांचे बॉक्सही जप्त केले आहेत.

Drugs
बलात्कार करून गोव्यात पळून आलेल्या हिमाचल प्रदेशच्या आरोपीला मडगावात अटक

गोव्यासह अनेक ठिकाणी कॅनाबिस औषधाच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र पर्वरीतील एका क्लिनिकमध्ये या औषधाची अनेक दिवसांपासून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून याचा तपासही सुरु केला होता. अखेर आल्तो पर्वरी येथील कॅनाडॉक क्लिनिकवर पोलिसांनी छापा टाकला आहे. यात क्लिनिकचा मालक संशयित अर्जुन खन्ना यास एनडीपीएस कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 2.23 लाखांचे तब्बल 83 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

Drugs
हळदोणा येथे कुजलेल्या अवस्थेत सापडला पुरुषाचा मृतदेह

गोव्यात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यातच हणजुण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करुन 10 लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ड्रग्स विकणारा पेडलर आणि ड्रग्स सप्लाय करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.