Goa Police Recruitment 2021:  ‘कॉल लेटर्स’ न मिळाल्याने उमेदवार संभ्रमात

Goa Police Recruitment 2021
Goa Police Recruitment 2021

पणजी: Goa Police Recruitment 2021 पोलिस खात्यात कॉन्स्टेबल(Police constable)पदासाठी बुधवारपासून म्हणजे आजपासून भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ही भरती प्रक्रिया पावसामुळे रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस खात्याने मात्र ते अजून जाहीर केलेले नाही. पोलिस खात्याच्या या अजब कारभारामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. उमेदवारांना ‘कॉल लेटर्स’ मिळाली नसल्याने ते संभ्रमात आहेत. (Goa Police Recruitment 2021 About 16000 applications for 913 constable posts)  

जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याचे माहिती असतानाही पोलिस खात्याने उमेदवारांची शारीरिक चाचणी ठेवली होती. या चाचणीत धावणे हा प्रकार असल्याने पावसात ते शक्य नाही, हा विचार खात्याने कसा केला नाही, याचेही नवल वाटते. ही चाचणी पावसाळ्यात घेतल्यास धावताना निसरड्या मैदानावर पडून इजा होण्याची शक्यता असल्याने काही उमेदवारांमध्ये नाराजी होती. आता ही भरती प्रक्रिया रद्द झाली काय, याबाबत उमेदवाराना कल्पना नाही, त्यामुळे आज बुधवारी सकाळी उमेदवार पोलिस मुख्यालयात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुलै व सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया 
कॉन्स्टेबल्स पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी 16 जूनपासून होणार होती ती पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यासंदर्भातचा निर्णय खात्याने घेतला आहे. पावसाळ्यात उमेदवारांची धावण्याची चाचणी घेणे शक्य नसल्याने ती सप्टेंबरच्या अखेरीस घेण्यात येईल. या चाचणीमधील उमेदवारांची उंची, छाती व वजन मोजमाप प्रक्रिया जुलैच्या अखेरीस सुरू केली जाईल अशी माहिती पोलिस अधीक्षक (मुख्यालय) अभिषेक धानिया यांनी दिली. 

913 कॉन्स्टेबल पदांसाठी सुमारे 16 हजार अर्ज 
पोलिस खात्यातील 913 कॉन्स्टेबल पदांसाठी सुमारे 16 हजार अर्ज आले आहेत. रिक्त असलेल्या पदांसाठी 767 पुरुष व 146 महिला कॉन्स्टेबल्सची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 23 हजार अर्ज उमेदवारांनी खरेदी केले होते त्यापैकी 16 हजार जणांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे सुमारे 12,500 तर महिला उमेदवारांचे सुमारे 3500 अर्ज आले आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असली तरी पदवीधर, पदविका तसेच काही आयटीआय शिक्षण केलेल्या अर्ज केलेल्या अर्जदारांचाही समावेश आहे.

काय होते आदेशात
शारीरिक चाचणीमध्ये उंची, छाती व वजन मोजमाप याच्याव्यतिरिक्त धावणे, लांब उडी, उंच उडी तसेच 800 मीटर्स व 400 मीटर्स धावण्याचा समावेश आहे. धावण्यामध्ये काही विशिष्ट वेळेतच अंतर पार करणारेच पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या नोकरभरतीसंदर्भातची पत्रे संबंधित उमेदवारांना पाठवण्यात येतील. त्यामध्ये या चाचणीचे ठिकाण व वेळ नमूद करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक (मुख्यालय) अभिषेक धानिया यांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com