Goa: डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांना हुसकावले

डिचोलीत दोन ठिकाणी पोलिसांची कारवाई (Goa)
Goa: डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या  विक्रेत्यांना हुसकावले
डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांना हुसकावताना पोलिस (Goa)Dainik Gomanak

Goa: 'कोविड' संचारबंदीचा (Curfew) फायदा घेत डिचोलीला रस्त्यालगत बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना हुसकावण्यात आले. गुरुवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी डिचोली पोलिस स्थानकाचे (Bicholim Police station) पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन ठिकाणी ही कारवाई केली. डिचोली-साखळी (Bicholim - Sankhalim) आणि मये (Mayem) रस्त्याच्या बाजूला बसलेल्या भाजी व अन्य साहित्य विकणाऱ्या पंधराहून अधिक विक्रेत्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. पोलिसांनी हुसकावाताच विक्रेत्यांनी सामनासह गाशा गुंडाळला. पोलिसांच्या या कारवाईमुळे विक्रेत्यांनी तीव्र नाराजी (Vendors resented) व्यक्त केली आहे.

डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या  विक्रेत्यांना हुसकावताना पोलिस (Goa)
Goa: गोव्यात बिगर गोमंतकीयांचा धंदा तेजीत

संचारबंदीमुळे मे महिन्यांपासून डिचोली शहरातील बाजारावर बऱ्याच प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. आठवडी बाजाराला देखील पालिकेने प्रतिबंध केला आहे. संचारबंदी लागू होताच भाजीपाला तसेच फळविक्रेत्यांनी बाजाराबाहेर विविध ठिकाणी रस्ते व्यापले असल्याचे सर्वत्र निदर्शनास येते. या विक्रेत्यांमध्ये राज्याबाहेरील विक्रेत्यांचा अधिक भरणा आहे. डिचोली-साखळी या मुख्य रस्त्यावर तर विविध ठिकाणी विक्रेत्यांनी रस्ते व्यापून आपला व्यवसाय सुरु केला होता. झांट्ये महाविद्यालयापासून काही अंतरावर डिचोलीच्या बाजूने तर विक्रेत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत होता. या पाजवाड्याच्या माथ्यावर मयेच्या दिशेने जाणारा रस्ताही विक्रेत्यांनी व्यापला होता. या विक्रेत्यांकडे खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दीही दिसून येत होती. गर्दीमुळे एकाबाजूने 'कोविड' संसर्गाची तर दुसऱ्याबाजूने अपघातांचीही भिती निर्माण होत होती. संभाव्य धोक्यावर नियंत्रण आणण्यासाठी अखेर गुरुवारी या दोन्ही रस्त्याच्या बाजूने बसणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करताना त्यांना तिथून हुसकावून लावले.

डिचोली येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या  विक्रेत्यांना हुसकावताना पोलिस (Goa)
Goa: मुरगाव मार्केटमध्ये सकाळी कारवाई, सायंकाळी पुन्हा अतिक्रमण

आम्ही करायचे काय?

बाजारात बसायला प्रतिबंध करण्यात येत असल्याने आम्ही शहराबाहेर व्यवसाय सुरु केला होता. 'कोविडा'चे कारण पुढे करून आम्हाला हुसकावून लावल्याने आम्ही करायचे तरी काय? नियम आम्हालाच का? असे प्रश्न विक्रेते व्यक्त करीत आहेत. विक्री करायला मिळत नसल्याने भाजीपाला खराब होणार आहे. आम्हाला आर्थिक फटका बसणार आहे, असे दीपक नामक विक्रेत्याने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com