गोव्याच्या किनाऱ्यांवर बेकायदेशीर कारवायांना ऊत, पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये

समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेबाबत बुधवारी चर्चा झाल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
गोव्याच्या किनाऱ्यांवर बेकायदेशीर कारवायांना ऊत, पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये
Sea shore Dainik Gomantak

पणजी: राज्यातील समुद्रकिनारे हे पर्यंटकांसाठी सुरक्षित तसेच स्वच्छ असावेत तरच पर्यटनाला चालना मिळणार आहे त्यासाठी सर्व किनाऱ्यांवरील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी ठोस पावले येत्या काही दिवसांत उचलली जाणार आहेत. (Goa police to curb illegal activities on sea shores)

Sea shore
गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोंकणीचाही समावेश

त्यासाठी पर्यटन, पोलिस व विविध घटक एकत्रित असण्याची गरज आहे. यावर बुधवारी चर्चा झाल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पोलिस महासंचालक, पर्यटन संचालक, गोवा इलेक्ट्रॉनिक लि. (गेल) या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पर्यटक हे ‘अतिथी देवो भव’ असतात. पर्यटकाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हे काम पोलिस, पर्यटन अधिकारी तसेच समुद्रकिनारे सफाईचे काम मिळालेल्या दृष्टी लाईफसेव्हिंग कंपनीचे असून त्यांनीच ही सुरक्षितता पुरवून तत्पर रहावे, असे खंवटे म्हणाले.

Sea shore
नीलेश काब्राल हतबल; मॉन्सूनपूर्वी राज्यातील रस्ते दुरुस्त होणे अशक्य

दरम्यान, समुद्रकिनारे स्वच्छतेसाठी सरकारने दिलेल्या कंत्राटबाबतची याचिका गोवा खंडपीठात आहे. राज्यातील कचरा याचिकेत सरकारने लोकायुक्तने केलेल्या शिफारशींनुसार तक्रार दाखल करण्याऐवजी ती कोणत्या आधारावर बंद करण्यात आली आहे याचे स्पष्टीकरण मागितले आहे. आगामी पर्यटन मोसम सुरू होण्यापूर्वी शॅक व जलक्रीडा ऑपरेटरर्सबरोबर चर्चा घेऊन सर्व काही सुरळीत केले जाईल, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.