Goa Police च्या पावलावर पाउल ठेवणार एमपी पोलिस ; नरोत्तम मिश्रांनी दिले निर्देश

Narottam Mishra on MP Tourism: गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, एपीला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांची माहिती पोलिसांकडे असायला हवी.
Narottam Mishra| Goa Police
Narottam Mishra| Goa PoliceDainik Gomantak

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी बुधवारी राज्य पोलिसांना येथे येणाऱ्या पर्यटकांच्या (Tourist) सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मिश्रा म्हणाले की, एमपी पोलिसांनी गोवा पोलिसांच्या (Goa Police) कार्यपद्धतीचा अभ्यास करावा जेणेकरून पर्यटकांच्या सुरक्षेबाबत अधिक काम करता येईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यात अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राजेश राजोरा आणि पोलीस महासंचालक (DGP) सुधीर सक्सेना यांच्यासह अन्य उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

  • पर्यटकांचा मूळ देश आणि भाषा कोणती आहे याची माहिती ठेवावी

नरोत्तम मिश्रा यांनी मध्य प्रदेश पोलिसांना गोवा पोलिसांच्या व्यवस्थेचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना योग्य सुरक्षा प्रदान करता येईल.मध्य प्रदेशात योग्य पर्यटक (Tourist) पोलिस यंत्रणा निर्माण करण्यासाठी पर्यटकांची संख्या, त्यांचा मूळ देश आणि त्यांच्याकडून बोलल्या जाणार्‍या भाषांची योग्य माहिती गोळा करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अशी माहिती गोळा करूनच चांगली व्यवस्था करता येईल, असे मिश्रा म्हणाले.

  • भोपाळमध्ये एका पर्यटकाकडून लुट

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका पर्यटकाकडून लूट करण्यात आली होती. आता गृहमंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यासोबत मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की,गोव्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि गोवा पोलीस (Goa Police) त्यांचे संरक्षण करतात. त्याचप्रमाणे आता मध्य प्रदेश पोलीसही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करणार आहेत. मध्यप्रदेश पोलिसांचे (MP Police) एक पथक गोवा पोलिसांच्या कामकाजाचा अभ्यास करून त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी गोव्यात जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com