
राज्यातील राजकीय पक्ष प्रतिनिधींनी आज गोवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली असून यावेळी राजकिय प्रतिनिधींनी राज्यातील मतदारांच्या मतदार यादीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नेत्यांनी आयोगाकडून मतदार यादी वेळेत मिळाल्यास मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होईल असे म्हटले आहे.
(goa Political party representatives meeting with chief electoral officer Ramesh Verma )
मिळालेल्या माहितीनुसार आज राज्यातील राजकीय पक्ष प्रतिनिधींनी गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्यासोबत बैठक पार घेतली. या बैठकीस भाजपचे पुंडलिक राऊत देसाई, काँग्रेसचे अल्तिन्ह गोम्स, आम आदमी पक्षाचे सुरेल तिळवे, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्राची गोडकर आणि एरोल पायरे हे उपस्थित होते.
या बैठकिवेळी वर्मा म्हणाले की, भारताच्या निवडणूक आयोगाने गोव्यासाठी पात्रता तारीख (special summary revision of photo electoral rolls ) म्हणून 1 जानेवारी 2023 च्या अनुशंगाने छायाचित्रासह अद्ययावत मतदार काही सुधारणा सुचवल्या असल्याची माहिती दिली.
याबाबत त्यांनी नमूद केले की 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान दावे आणि हरकती दाखल करण्याच्या कालावधीसह याबाबतची माहिती दिली जाईल. तसेच 3 जानेवारी 2023 रोजी मतदारांच्या अंतिम याद्या निवडणूक आयोग प्रकाशित करेल अशी माहिती दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.