भाजप म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष: राहुल म्हांबरेंचा सरकारवर निशाणा

अटल सेतूवरून साधला निशाणा
Goa Politics AAP allegations against BJP
Goa Politics AAP allegations against BJPDainik Gomantak

पणजी (Panjim): 2019 मध्ये तब्बल 1400 कोटी रुपये खर्चून उद्‍घाटन करण्यात आलेला अटल सेतू दोन वर्षांच्या कालावधीतच देखभालीसाठी बंद करण्यात आला आहे. स्वत:ला प्रगती आणि विकासाचा पक्ष म्हणवून घेणारा भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार जनता पक्ष असल्याचेच हे प्रतीक आहे (Goa Politics), असा आरोप आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी आज (सोमवारी) केला.

Goa Politics AAP allegations against BJP
तपासकार्यातील अपयश लपवण्यासाठी नैसर्गिक मृत्‍यूचा कांगावा?

मेरशी सर्कल ते केटीसी बसस्थानकापर्यंत रस्त्याचे ओव्हरलेयिंग आणि हॉट मिक्सिंगचे काम करण्यासाठी अटल सेतू गेल्या तीन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. तसेच हा पूल केवळ 100 दिवसांसाठी बंद केला जाईल, अशी ग्वाही सरकारने दिली होती.आज 100 दिवस उलटून गेले तरी काम पूर्ण होताना दिसत नाही, असेही म्हांबरे म्हणाले. मांडवी नदीवरील तिसरा पूल 2019 मध्ये वाहनांसाठी खुला करण्यात आला; मात्र प्रत्येक पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडले असल्याचे दिसून आले.

सरकार केवळ कार्यक्रमातच व्यस्त

सरकारच्या प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार दिसून येत आहे. कार्यक्रमांच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जात आहेत. सरकारने नागरिकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यास काम केले पाहिजे,परंतु सरकार इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्यस्त आहे, असा टोला म्हांबरे यांनी लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com