भाजपशी युती म्हणजे राजकीय आत्महत्या: ढवळीकर

कासारपालीत 'दसरा' मेळाव्यात मगोचा सिंह गर्जला
कासारपालीत मगो पक्षाचा 'दसरा' मेळावा संपन्न
कासारपालीत मगो पक्षाचा 'दसरा' मेळावा संपन्न दैनिक गोमन्तक

Goa Politics: आता पुन्हा भाजपशी युती (Alliance with BJP) म्हणजे मगोसाठी (MGP) तिसऱ्यांदा राजकीय आत्महत्या (Political mistake) ठरणार आहे. यापुढे युती नव्हे, तर मगो स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार. अशी गर्जना मगोचे नेते तथा आमदार सुदीन ढवळीकर (MGP Leader Sudin Dhavalikar) यांनी कासारपाल येथे 'मगोच्या 'दसरा मेळाव्या'त (MGP's Dussehra Melawa) कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली. बोलताना केली.

कासारपालीत मगो पक्षाचा 'दसरा' मेळावा संपन्न
डिचोलीत 'एसओपी' पाळून ऑफलाईन वर्ग

कासारपाल येथील श्रीसंदीपक सभागृहात हा 'दसरा मेळावा' आज (रविवारी) आयोजित करण्यात आला होता. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळेच राज्यात परिवर्तन झाले आहे. प्रत्येक गोष्टीचा उदोउदो करणाऱ्या भाजपने राज्यासाठी फारसे काहीच केलेले नाही. भाजपने स्वयंपूर्तीकडे नव्हे, तरराज्याच्या विघटनाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. अशी टीका श्री. ढवळीकर यांनी यावेळी बोलताना करून केवळ जनताच नव्हे, तर निसर्गही भाजपवर कोपलाय. अशी उपहासात्मक टीका केली. भाजपने टीका करताना तारतम्य बाळगावे. केवळ आत्मनिर्भरच्या वलग्ना करण्याऐवजी अगोदर आत्मनिरीक्षण करावे. असा सल्ला श्री. ढवळीकर यांनी यावेळी देऊन, मगोच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे झटावे. असे आवाहन केले.

याप्रसंगी व्यासपिठावर नरेश सावळ, मेणकूरेची सरपंच संजना नाईक, उपसरपंच ज्ञानेश्वर परब, लाडफेचे उपसरपंच यशवंत वरक, पंच प्रशांत घाडी, डिचोलीच्या नगरसेविका ऍड. अपर्णा फोगेरी, ऍड. रंजना वायंगणकर, मगोच्या महिला अध्यक्ष प्रिया मळीक, मगोचे डिचोलीचे उपाध्यक्ष न्हानू नाईक, युवा अध्यक्ष रुपेश गावस, नरेश कडकडे, विद्या परब, कॅजीटन वाझ, महेश्वर परब तसेच विविध पंचायतींचे सरपंच-पंचसदस्य आदी उपस्थित होते.

कासारपालीत मगो पक्षाचा 'दसरा' मेळावा संपन्न
आम आदमी पक्षाचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविणार: प्रेमानंद नानोस्कर

विजय मगोचाच

मी डिचोलीतील जनतेसाठी असून,जनता हे आपले कुटुंबं आहे. जनता सुखी रहावी. युवा पिढी बरबाद होऊ नये. हिच आपली प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी आपली कायम धडपड असते. असे यावेळी बोलताना नरेश सावळ यांनी सांगून, डिचोलीच्या विकासासाठी आपण सुदीन ढवळीकर यांच्याबरोबरच राहणार.असा पुनःरूच्चार केला. कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकीत डिचोलीत मगोचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास सावळ यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेश सावळ यांचा झालेला पराभव हा डिचोलीच्या विकास प्रक्रियेला लागलेला 'ब्रेक' आहे. असे कुंदन फोगेरी यांनी सांगून, येत्या निवडणुकीत सावळ यांच्या विजयासाठी प्रत्येकांनी तळमळीने झटावे. असे आवाहन केले. कोमल चव्हाण हिने काली स्तुती भरत नाट्यम नृत्य सादर केले. मगोचे युवा अध्यक्ष रुपेश गावस यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन यदुनाथ शिरोडकर यांनी केले. प्रिया मळीक हिने आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com