टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार..

गोवा आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष प्रेमानंद (बाबू) नानोस्कर यांनी माहिती दिली
टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार..
Goa Politics : टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार..Dainik Gomantak

दाबोळी : राज्य सरकार पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांना (taxi business) न्याय देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गोव्यात एखादा युवक सरकारी नोकरी पासून वंचित राहिल्यास शेवटी त्याच्या जवळ एकच पर्याय राहतो तो म्हणजे टॅक्सी व्यवसाय करून आपले कुटुंब सांभाळणे. या व्यवसायात सुद्धा सरकार मनमानी करीत असल्याने राज्यातील टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्ष नेते अरविंद केजरीवाल (Goa Politics) पुढाकार घेणार असल्याची माहिती गोवा आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष प्रेमानंद (बाबू) नानोस्कर यांनी दिली.

Goa Politics : टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार..
पश्चिम बगल रस्त्याचे काम स्थानिकांनी पुन्हा पाडले बंद..!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मंगळवारी (दि.16) दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे गोवा आम आदमी पक्षाचे मुख्य निमंत्रक राहुल म्हाबरे, माजी आमदार महादेव नाईक, कळंगुट पंचायतीचे पंच सुदेश मयेकर, सुनील लॉरेन, परशुराम सोनुर्लेकर व इतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात केजरीवाल यांचे स्वागत केले. पुढे बोलताना आपचे उपाध्यक्ष तथा दाभोळीचे नेते प्रेमानंद नानोस्कर म्हणाले की दाबोळी विमानतळावरील टॅक्सी व्यवसायिकांबरोबर संपूर्ण गोव्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांना न्याय देणे आम आदमी पक्षाचे प्रथम कर्तव्य असून त्यांना त्याचा हक्क देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल पुढाकार घेणार आहे. यासाठी बुधवार (दि.17) राज्यातील सर्व पर्यटक टॅक्सी व्यवसायीकांबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची बैठक संपन्न होणार आहे.

Goa Politics : टॅक्सी व्यवसायाला न्याय देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा पुढाकार..
करोडो रुपयांच्या घोटाळ्याला मंत्री मिलिंद नाईक जबाबदार: गिरीश चोडणकर

यावेळी आमचे नेते महादेव नाईक म्हणाले की राज्य सरकारने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका प्रकारे राज्यातील युवकांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुका जवळ येताच सरकारने सरकारी नोकऱ्या जाहीर करणे म्हणजे निवडणुकीचा फंडा असल्याची माहिती नाईक यांनी दिली. आपचे नेते निमंत्रक राहुल म्हाबरे म्हणाले की दिल्लीतील केजरीवाल सरकारला सर्व आश्वासने पूर्ण करून दाखवलेली आहे. यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत सुद्धा केजरीवाल सरकार प्रमाणे येथेसुद्धा आप यश संपादन करणार असल्याची माहिती म्हामरे यांनी दिली. कळंगुट पंचायत सुदेश मयेकर यांनी सांगितले की राज्यात टॅक्सी व्यवसाय संकटात टाकण्याचा कट राज्य सरकार करीत असल्याचा आरोप केला. कारण टॅक्सी व्यवसायिकांना राज्य वाहतूक मंत्रालय व वाहतूक संचालकांच्या आदेशामुळे खूपच त्रास सहन करावा लागतो. यासाठी राज्य सरकारने टॅक्सी व्यावसायिकांना सामावून घेऊन राज्य पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांचे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी पंच मयेकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com