भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दोन दिवस गोवा दौरा..

बुधवारी त्यांचे रात्री उशिरा गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले
Goa Politics : J.P Nadda
Goa Politics : J.P Nadda Dainik Gomantak

दाबोळी Goa Politics: भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस गोव्याच्या दौऱ्यावर आले असून आज बुधवारी त्यांचे रात्री उशिरा गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.त्यांचे दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड यांनी स्वागत केले.

Goa Politics : J.P Nadda
Goa: जागरूक, सतर्क राहाल तरच टिकाल

विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक तयारीला गती दिलीआहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून वारंवार गोव्याला भेट देऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. भाजपाध्यक्ष नड्डाही त्याच हेतूने बुधवारी रात्री गोव्यात दाखल झाले आहेत. बुधवारीच पणजीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ते भाजपचा डॉक्टर सेल, तसेच इतर डॉक्टरांशीही संवाद साधणार आहेत.

Goa Politics : J.P Nadda
'मोदी सरकारचे धोरणे देशाच्या एकात्मेसाठी धोकादायक'!

त्यानंतर गुरुवारी ते सत्तरी आणि डिचोली या दोन तालुक्यांत आयोजित मेळाव्यांना उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. साखळी मतदारसंघातील बूथ समित्यांचाही आढावा घेतील. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सोमवारी गोव्यात आले होते. फडणवीस यांनी सोमवारी मांद्रे मतदारसंघातील दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. बुधवारी त्यांनी केपे आणि मुरगाव येथील मेळाव्यांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीसाठी त्यांना ऊर्जा देण्याची मोहीम फडणवीस यांनी सुरू केली असून, पुढील काही दिवसांत ते विविध मतदारसंघांत जाणार असल्याचेही समजते.त्याच अनुषंगाने भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात दाखल झाले आहे.गुरुवारी ते सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. तसेच साखळीतील बूथ समित्यांचाही आढावा घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com