मुख्यमंत्री सावंत यांचा तृणमुलला टोला

गोव्यात कोविड सारख्या नैसर्गिक आपत्तीचेच आक्रमण होत नसून या दिवसात काही बाहेरून मानव निर्मित आपत्ती गोव्यात येऊ लागल्या आहेत. त्यापासून गोवेकारांनी सावध राहावे असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मडगावात केले.
मुख्यमंत्री सावंत यांचा तृणमुलला टोला
Goa politics : बाहेरून येणाऱ्या आपत्ती पासून सावध राहा, मुख्यमंत्री सावंत यांचा नाव न घेता तृणमुलला टोलाDainik Gomantak

मडगाव: गोव्यात (Goa) कोविड (Covid) सारख्या नैसर्गिक आपत्तीचेच आक्रमण होत नसून या दिवसात काही बाहेरून मानव निर्मित आपत्ती गोव्यात येऊ लागल्या आहेत. त्यापासून गोवेकारांनी सावध राहावे असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मडगावात केले.

सध्या गोव्याच्या राजकारणात (Politics) ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल (trinmool) काँग्रेसने प्रवेश केला आहे. त्यांनी गोवा पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी तृणमूलचे नाव न घेता हा टोला हाणला.

Goa politics : बाहेरून येणाऱ्या आपत्ती पासून सावध राहा, मुख्यमंत्री सावंत यांचा नाव न घेता तृणमुलला टोला
मोरजी किनारी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम

मडगावात वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आले असता बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी, आता बाहेरच्या काही शक्ती गोव्यात आपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशानेच आत शिरल्या आहेत. त्यांच्यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे. लोक आणि प्रशासन जर एकत्रित हातात हात घालून चालू लागले तरच हे शक्य होईल असे ते म्हणाले.

गोव्यात सध्या सर्वत्र रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामुळे सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना उल्लेखून बोलताना सावंत म्हणाले, कोविडच्या काळात राज्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रूग्णांची सेवा केली. त्यामुळे राज्यात कोविडची साथ नियंत्रणात राहिली. पत्रकारांनी फक्त रस्त्यावरील खड्ड्याबाबतच लिहू नये , डॉक्टरांच्या या कामाबद्दलही लिहावे असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.